कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेच्या ३६ विशेष गाड्या

By Admin | Updated: July 14, 2015 01:00 IST2015-07-14T01:00:51+5:302015-07-14T01:00:51+5:30

नाशिकमध्ये सुरू असलेल्या कुंंभमेळ्यासाठी होणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेने ३६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक रोड ते भुसावळ ते नाशिक रोड

36 special trains from Central Railway for Kumbh Mela | कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेच्या ३६ विशेष गाड्या

कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेच्या ३६ विशेष गाड्या

मुंबई : नाशिकमध्ये सुरू असलेल्या कुंंभमेळ्यासाठी होणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेने ३६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक रोड ते भुसावळ ते नाशिक रोड आणि इगतपुरी ते ओढा ते इगतपुरी दरम्यान या ट्रेन धावतील, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
गाडी क्रमांक 0१२३९ नाशिकहून १४, १५, १७, १८, १९ जुलैला २०.२५ वाजता सुटून भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी 00.५0 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 0१२४0 भुसावळहून याच दिवशी १४.१0 वाजता सुटून नाशिक रोड येथे त्याच दिवशी १९.१0 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 0१२४१ नाशिक रोड येथून जुलैच्या याच तारखांना 0९.१0 वाजता सुटून भुसावळ येथे त्याच दिवशी १३.१0 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 0१२४२ त्याच तारखांना भुसावळ येथून 0३.0५ वाजता सुटून नाशिक रोडला 0८.१0 वाजता पोहोचेल. या गाड्यांना ओढा, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगांव, पाचोरा, जळगाव येथे थांबा देण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 0१२४३ इगतपुरी येथून जुलैच्या १४,१५,१६ तारखांना 0८.१0 वाजता सुटून ओढा येथे त्याच दिवशी 0९.४0 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 0१२४४ ओढा येथून याच दिवशी ११.0५ वाजता सुटून इगतपुरी येथे १३.४0 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 0१२४५ इगतपुरी येथून जुलैच्या १४,१५,१६,१८ आणि १९ तारखांना १४.३0 वाजता सुटून ओढा येथे त्याच दिवशी १५.४0 वाजता पोहोचेल. (प्रतिनिधी)

Web Title: 36 special trains from Central Railway for Kumbh Mela