यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे ३६ जणांचा मृत्यू

By Admin | Updated: August 30, 2015 01:23 IST2015-08-30T01:23:50+5:302015-08-30T01:23:50+5:30

यंदाच्या पावसाळ्यात जुलै व आॅगस्टमध्ये झालेला मुसळधार पाऊस, पूर व वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये ३६ व्यक्तींचा मृत्यू झाला. लहान-मोठी १९३ जनावरे मृत झालीत.

36 deaths due to natural calamities this year | यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे ३६ जणांचा मृत्यू

यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे ३६ जणांचा मृत्यू

अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात जुलै व आॅगस्टमध्ये झालेला मुसळधार पाऊस, पूर व वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये ३६ व्यक्तींचा मृत्यू झाला. लहान-मोठी १९३ जनावरे मृत झालीत. तसेच ५ हजार ३५७ घरांची पडझड झाली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात १८ ते २३ जुलै व ४ ते १२ आॅगस्टदरम्यान मुसळधार पाऊस पडला. यामध्ये १८ व्यक्ती पुरात वाहून गेल्यात. यात अमरावती जिल्ह्णात ६, अकोला २, यवतमाळ ७, बुलडाणा जिल्ह्णातील ३ व्यक्तींचा समावेश आहे. दरड कोसळून वाशीम जिल्ह्णात एकाचा मृत्यू झाला. वीज पडून एकूण १६ जण ठार झालेत. यामध्ये अमरावती जिल्ह्णात ४, अकोला २, यवतमाळ ४, बुलडाणा ४ व वाशीम जिल्ह्णातील दोघांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: 36 deaths due to natural calamities this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.