शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’च्या 3500 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामच नाही, हजेरी भरणे बंद; ‘काम नाही, तर दाम नाही’ने अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 12:23 IST

ST Bus: कोरोना निर्बंध शिथिल झाले असले तरी एसटीला अद्यापही अपेक्षित प्रवासी मिळत नाहीत. बसफेऱ्या कमी होत आहेत आणि काही गाड्या ऐनवेळी रद्दही होत आहेत.

- विलास गावंडे यवतमाळ : कोरोना निर्बंध शिथिल झाले असले तरी एसटीला अद्यापही अपेक्षित प्रवासी मिळत नाहीत. बसफेऱ्या कमी होत आहेत आणि काही गाड्या ऐनवेळी रद्दही होत आहेत. याचा फटका रोजंदारी कर्मचाऱ्यांना बसत आहे. काही कर्मचाऱ्यांची हजेरी भरणे थांबविण्यात आले आहे. ‘काम नाही, तर दाम नाही’ हे एसटीचे धोरण आहे. यामुळे राज्यातील ३५०० रोजंदारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.

कोरोनाच्या आधी एसटीचे दररोजचे उत्पन्न २२ कोटी रुपये इतके होते. आज आठ ते दहा कोटींच्या घरातच आहे. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शहरातील प्रतिष्ठाने लवकर बंद होतात. त्यामुळे नागरिक प्रवास करणे टाळतात. यामुळे बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. सुरू फेऱ्यांवर प्रथम एसटीच्या कायम कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. यानंतर रोजंदार गट क्र. २ आणि नंतर रोजंदार गट क्र. १च्या चालक-वाहकांना पाठविले जाते.

आता काही ठिकाणी रोजंदार गट क्र. १च्या अर्थात महामंडळात नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कामगिरी देणे थांबविले आहे. पुढील काही दिवसात ही गती वाढण्याचे संकेत आहेत. राज्यात ३५०० रोजंदार गट क्र. १ कामगार आहेत. ते २०१८-१९ च्या भरती प्रक्रियेत महामंडळाच्या सेवेत दाखल झाले आहेत. सुरुवातीपासूनच त्यांना कामगिरी मिळण्यात अडथळे येत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच त्यांना कामगिरीसाठी भांडावे लागत आहे. आता पुन्हा त्यांच्यावर संकट आले आहे. 

प्रवासी संख्या कमी असल्याने बसफेऱ्यांवर परिणाम झाला आहे. गरजेनुसार कर्मचाऱ्यांना संधी दिली जात आहे. पुढील काळात तसेच शाळा सुरू झाल्यानंतर फेऱ्या वाढतील. त्यावेळी पुन्हा कामाची संधी मिळेल.- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, यवतमाळ 

लॉकडाऊनमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना ऑनड्यूटी समजून वेतन देण्यात येईल, असे शासनाचे परिपत्रक आहे. कामगिरी मिळो किंवा न मिळो सर्वांना वेतन मिळाले पाहिजे.श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस 

...तर आर्थिक गणित कोलमडणारnकोरोनाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. त्यामुळे एसटीचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारास विलंब होण्याची शक्यता आहे. जर पगारास विलंब झाला, तर कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोसळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :state transportएसटीMaharashtraमहाराष्ट्र