अरणगाव येथील तलाव फुटल्यानंतर पुरात अडकले ३५ जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 05:02 IST2017-09-21T05:02:52+5:302017-09-21T05:02:54+5:30

अरणगाव येथील तलाव फुटल्यानंतर आलेल्या पुराचा वाळुंज येथील परिट वस्तीला वेढा पडला आहे. त्यात ३५ गावकरी अडकले आहेत. रात्री पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता पथकाला पाचारण करण्यात आले होते.

35 people stuck in the yard after the cantonment in Arnaga was broken | अरणगाव येथील तलाव फुटल्यानंतर पुरात अडकले ३५ जण

अरणगाव येथील तलाव फुटल्यानंतर पुरात अडकले ३५ जण


अहमदनगर : अरणगाव येथील तलाव फुटल्यानंतर आलेल्या पुराचा वाळुंज येथील परिट वस्तीला वेढा पडला आहे. त्यात ३५ गावकरी अडकले आहेत. रात्री पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता पथकाला पाचारण करण्यात आले होते.
पुराचे पाणी वस्तीपर्यंत पोहोचल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली.त्यामुळे काही गावकरी उंचावर गेले तर काहींना घराच्या छताचा आधार घ्यावा लागला़ सायंकाळी तहसीलदार सुधीर पाटील घटनास्थळी दाखल झाले. मात्र गावकरी ४०० ते ५०० मीटर अंतरावरील पाण्यात अडकल्याने तेथे पथकाला पोहोचता येत नव्हते़ सायंकाळी लष्कराच्या ४० सैनिकांची तुकडी घटनास्थळी दाखल झाली, मात्र त्यांनाही वस्तीपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही़ बोटी नसल्याने मदतकार्यात अडथळा आला. शेवटी रात्री दहाच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता पथकाला पाचारण करण्यात आले होते़

Web Title: 35 people stuck in the yard after the cantonment in Arnaga was broken