‘३४३ औषधांवरील बंदी अयोग्य’

By Admin | Updated: March 16, 2016 08:37 IST2016-03-16T08:37:10+5:302016-03-16T08:37:10+5:30

केंद्र शासनाने ३४३ औषधांच्या उत्पादनावर बंदी घातल्याचा निर्णय अयोग्य असल्याची टीका अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेतर्फे करण्यात आली आहे. औषधांचे

'343 inappropriate ban on drugs' | ‘३४३ औषधांवरील बंदी अयोग्य’

‘३४३ औषधांवरील बंदी अयोग्य’

मुंबई : केंद्र शासनाने ३४३ औषधांच्या उत्पादनावर बंदी घातल्याचा निर्णय अयोग्य असल्याची टीका अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेतर्फे करण्यात आली आहे. औषधांचे उत्पादन व विक्री करण्याचे परवाने संबंधित विभागाच्या प्रशासनाकडून घेऊनच औषधांचे उत्पादन व विक्री होत होती. असे असताना कोणत्याही उत्पादकाला विश्वासात न घेता बंदीबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.
ही औषधे घातक असतील तर उत्पादनांचे परवाने कसे वाटले, असा सवालही संघटनेतर्फे करण्यात आला आहे. सरकारने आमच्या भूमिकेकडे लक्ष न देता कारवाईची भूमिका घेतल्यास आमची औषधांची दुकाने१० ते १५ दिवस बंद ठेवावी लागतील. त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितीस शासन जबाबदार राहील, असा इशारा संस्थेचे अध्यक्ष जे. एस. शिंदे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: '343 inappropriate ban on drugs'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.