शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विधान परिषदेच्या ३३% जागा अद्याप रिकाम्याच; सध्याची सभागृहाची परिस्थिती काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 06:51 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्याची झळ, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

मुंबई - महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण संख्याबळ ७८ इतके आहे, त्यातील २६ जागा आजमितीस रिक्त आहेत. हे ज्येष्ठांचे सभागृह ३३ टक्के रिकामे असल्याचे चित्र सध्यातरी बदलण्याची शक्यता नाही. 

विक्रांत पाटील, चित्रा वाघ, बाबूसिंग राठोड (भाजप), हेमंत पाटील, मनीषा कायंदे (शिंदेसेना), पंकज भुजबळ, इद्रिस नायकवाडी (अजित पवार गट) अशा सातजणांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर आधीच पाठविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

राज्यपाल नियुक्त आमदारांची एकूण संख्या १२ असते. पाच जागा अजूनही रिक्त आहेत आणि त्या लगेच भरण्यासाठी महायुतीमध्ये सध्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. भविष्यात या पाच जागा भरताना भाजपला तीन आणि अन्य दोन मित्रपक्षांना प्रत्येकी एक अशा जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. 

सदस्यांतून आमदार निवडून पाठविण्याचाही खोळंबा

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबईत सुरू होत असून, या अधिवेशनातही विधान परिषदेचे संख्याबळ हे एकूण संख्येच्या दोन तृतियांश इतकेच असेल. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या २२ पैकी तब्बल १६ जागा सध्या रिक्त आहेत. जवळपास तीन वर्षांपासून बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या सदस्यांमधून विधान परिषदेवर आमदार निवडून पाठविण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. या निवडणुका झाल्यानंतरच विधान परिषदेवर सदस्य निवडून देण्यासाठीची निवडणूक होईल. 

अशी आहे विधान परिषदेची स्थिती 

मतदारसंघाचे नाव एकूण जागाभरलेल्या जागारिक्त जागा
विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित३०२५०५
स्था. स्व. संस्थांद्वारे निर्वाचित२२०६१६
पदवीधर मतदारसंघांमधून निर्वाचित ०७०७
शिक्षक मतदारसंघामधून निर्वाचित०७०७
राज्यपाल नामनियुक्त१२०७०५

 

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदMahayutiमहायुतीBJPभाजपा