शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टी, हिप्परगी धरणांवर सांगलीच्या ३२ अधिकाऱ्यांची नियुक्ती, पाणीपातळीची वास्तव माहिती मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:57 IST

कर्तव्यात कसूर केल्यास शिस्तभंगाची कारवाई

सांगली : अलमट्टी, हिप्परगी धरणातीलपाणीसाठा, विसर्गाची वस्तुस्थितीची माहिती मिळण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने ३२ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांना रोज बदलून ड्युट्या लावण्यात येणार आहेत, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. २९ जून १५ ऑक्टोबर या कालावधीत अधिकारी धरणाच्या ठिकाणी असणार आहेत.कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात सध्या संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे अलमट्टी धरणात ७६ हजार ७०१ क्युसेकने पाण्याची आवक होत असून विसर्ग ७० हजार क्युसेक आहे. धरणात सध्या ७६.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ६२ टक्के भरले आहे. गतवर्षी २४ जून २०२४ रोजी २५ टक्के धरणात पाणीसाठा होता. जून महिन्यातच धरण ६२ टक्के भरल्यामुळे कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेज येथील वस्तुस्थितीची माहिती मिळण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अलमट्टी धरण येथे १६ आणि हिप्परगी बॅरेज येथे १६ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांना प्रत्येक दिवशी बदलून तिथे नियुक्त्या दिल्या आहेत. या अधिकाऱ्यांनी रोज सांगली पाटबंधारे विभागातील पूर नियंत्रण कक्षाला प्रत्येक तासाला धरणातील पाणीसाठा, विसर्ग, धरणाचे दरवाजे किती खुले आहेत यासह आदी माहिती कळवायची आहे.

कर्तव्यात कसूर केल्यास शिस्तभंगाची कारवाईसमन्वय अधिकारी यांनी नेमून दिलेल्या कामात कसूर केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत म.ना.से. (शिस्त व अपील) १९७९ अंतर्गत शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी अलमट्टी आणि हिप्परगी येथे वेळेत उपस्थित राहिले पाहिजे, असेही आदेशात म्हटले आहे.