केईएममध्ये बसविणार ३२ सीसीटीव्ही

By Admin | Updated: September 27, 2015 05:39 IST2015-09-27T05:39:47+5:302015-09-27T05:39:47+5:30

केईएम रु ग्णालयात येत्या ३० आॅक्टोबरपर्यंत महत्त्वाच्या ३२ ठिकाणी सीससीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. सध्या नादुरु स्त असलेले तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित केले जातील

32 CCTV to be installed in KEM | केईएममध्ये बसविणार ३२ सीसीटीव्ही

केईएममध्ये बसविणार ३२ सीसीटीव्ही

मुंबई : केईएम रु ग्णालयात येत्या ३० आॅक्टोबरपर्यंत महत्त्वाच्या ३२ ठिकाणी सीससीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. सध्या नादुरु स्त असलेले तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित केले जातील. तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष सुरक्षारक्षक नेमले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी दिली.
केईएममधील बालरुग्ण विभागातील एका बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. या मारहाणीत चार डॉक्टर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर निवासी डॉक्टर अचानक संपावर गेल्यामुळे रु ग्णसेवेवर परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर तावडे यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली. जखमी डॉक्टरांची विचारपूस केली. त्यानंतर विनोद तावडे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सद्य:स्थितीचा विचार करण्यात आला. या बैठकीला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार अजय चौधरी, नगरेसवक, रुग्णालयाचे डीन, पोलीस अधिकारी, तसेच मार्ड संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रुग्णालयात रुग्णसेवेवर कोणताही ताण न पडता रुग्णांना योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने रु ग्णालय प्रशासन दक्षता घेईल, असेही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. मार्डच्या निवासी डॉक्टरांनी केईएममध्ये सुरू केलेला संप आता मागे घ्यावा, असे आवाहनही महापौर स्नेहल आंबेकर यांनी यावेळी केले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 32 CCTV to be installed in KEM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.