शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

31 ऑक्टोबरपासून काँग्रेसचं जनआक्रोश आंदोलन, अहमदनगरमधून होणार सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 15:10 IST

सरकारची तीन वर्षातील कामगिरी अत्यंत निराशाजनक असून लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

ठळक मुद्देसरकारची तीन वर्षातील कामगिरी अत्यंत निराशाजनक असून लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.सरकारविरोधात 31 ऑक्टोबरपासून काँग्रेसकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. जनआक्रोश आंदोलन उभारून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हंटलं आहे.

मुंबई-  सरकारची तीन वर्षातील कामगिरी अत्यंत निराशाजनक असून लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. यासाठी सरकारविरोधात 31 ऑक्टोबरपासून काँग्रेसकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. जनआक्रोश आंदोलन उभारून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हंटलं आहे. 31 ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी अहमदनगर जिल्ह्यातून जनआक्रोश आंदोलनाची सुरुवात होणार आहे. तर सांगलीत विराट जाहीर सभेने जनआक्रोश आंदोलनाची सांगता करण्यात येईल. मुंबईत राधाकृष्ण पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण बोलत होते. 

नोटाबंदीमुळे लोकांना त्रास झाला असून देशाचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नोटबंदीच्या निर्णयाला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होतं आहे. त्याचदिवशी काळा दिवस पाळणार असल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हंटलं. कर्जमाफी म्हणजे आकड्यांचा फसवा खेळ असून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागलं नाही. अटी शर्ती घालून शेतक-यांना कर्जमाफीतून वगळलं आहे. राज्यात कर्जमाफीचा सावळा गोंधळ सुरु असल्याची टीकाही अशोक चव्हाण यांनी केली आहे. २००८-०९ च्या कर्जमाफीत गैरव्यवहाराचा आरोप चुकीचा आहे. सरकारला त्याची आता आठवण का येतेय? तेव्हा विरोधक म्हणून हे काय करत आहे, असा सवालही अशोक चव्हाण यांनी विचारला. कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीच्या सक्तीची अट तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे. 

अशोक चव्हाण यांनी आधार कार्डाच्या सक्तीवरूनही सरकारवर टीता केली आहे. आधार कार्डाची सक्ती राज्य सरकारने केली. बँकांनी ही सक्ती केली नव्हती. कमीतकमी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हेतूनेच तारीख पे तारीख आणि नवनवीन नियमांचा घाट घातला गेल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हंटलं. राज्यात सत्तेत बसलेल्या नेत्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. त्याच्यावर पकड नाही. एका दिवसात वीस वीस जीआर निघतायत. त्यामुळे हे सरकार घालवायला हवं. शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असंही अशोक चव्हाण यांनी म्हंटलं.

सरकारने अपमानास्पद वागणूक दिलीइतिहासात कधी नाही एवढी अपमानास्पद वागणूक या सरकारने दिली असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी म्हंटलं. स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांना इतकी अपमानास्पद वागणूक कधी मिळाली नाही. शेतक-यांचा आणि सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांचा फुटबॉल झाला आणि हे मात्र फिफा खेळत बसलेस असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. 

कर्जमाफीच्या यादीत आलेल्या बोगस नावांची चौकशी कराकर्जमाफीच्या यादीत आलेल्या बोगस नावाची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.  

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा