शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी ३० महिलांचे मुंडन

By admin | Updated: August 15, 2014 00:40 IST

श्रमिक एल्गारच्यावतीने मागील चार वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलने करण्यात येत आहे. शासनाला १३ आॅगस्ट ही शेवटची मुदत दिल्यानंतरही दारूबंदीची घोषणा करण्यात आली नसल्याने

चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांचा एल्गार : मुख्यमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याचा आरोपवरोरा : श्रमिक एल्गारच्यावतीने मागील चार वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलने करण्यात येत आहे. शासनाला १३ आॅगस्ट ही शेवटची मुदत दिल्यानंतरही दारूबंदीची घोषणा करण्यात आली नसल्याने गुरूवारी वरोरा शहरातील महात्मा गांधी चौकात श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांच्यासह ३० महिलांनी मुंडन करून दारूबंदीसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. श्रमिक एल्गारच्यावतीने पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात मागील चार वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी व्हावी, याकरिता विविध आंदोलने करण्यात येत आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने दारूबंदीसंदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने राज्य शासनाकडे दोन वर्षांपूर्वी अहवाल सादर केला. या अहवालावर आजतागायत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले असता, श्रमिक एल्गारच्या पदाधिकारी व सदस्यांनी दारूबंदीबाबत छेडले असता, सध्या आचारसंहिता आहे. त्यानंतर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. वारंवार पाठपुरावा करूनही चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात येत नसल्याने श्रमिक एल्गारच्यावतीने आॅगस्ट क्रांती अभियान सुरू करण्यात आले.१३ आॅगस्टपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली नाही तर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या वरोरा येथील निवासस्थानासमोर १४ आॅगस्ट रोजी महिला मुंडन करतील, असा इशारा देण्यात आला होता. ना.देवतळे यांच्या निवासस्थानासमोर मुंडन करण्याची परवानगी प्रशासनाने नाकारल्यानंतर वरोरा येथील महात्मा गांधी चौकात दुपारी १२ वाजता मुंडन आंदोलनाला सुरूवात झाली. प्रारंभी अनेक महिलांनी स्फूर्ती गीते सादर केली. अनेकांनी आपले विचारही व्यक्त केले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली पाहिजे. या मागणीकरिता श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांच्यासह ३० महिलांनी मुंडन केले. (तालुका प्रतिनिधी)