जिल्हा परिषदेचे ३० शिक्षक आदर्श
By Admin | Updated: September 10, 2016 02:31 IST2016-09-10T02:31:17+5:302016-09-10T02:31:17+5:30
रायगड जिल्हा परिषदेने ३० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे.

जिल्हा परिषदेचे ३० शिक्षक आदर्श
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेने ३० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे. ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी होणारा पुरस्कार सोहळा गणेशोत्सवामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने १५ तालुक्यातील ३० शिक्षकांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वाकळघर शालेतील भिकू पांगारकर, अलिबाग भिलजी बोरघर शाळेतील प्रमोद भोपी, रोहे निधी ठाकूरवाडी शाळेतील विद्या रोहेकर, पनवेल (दयानंद मोकल, महाड (सुटवली) निलांबरी घोलप, उरण (काळाधोंडा) बाबुराव म्हात्रे, माणगाव (पहेल) दयानंद ठाकूर, तळा (वैतागवाडी) यशवंत मोंढे, सुधागड-पाली नंबर-१ शाळेतील सुरेंद्र शिंदे, मुरुड (राजपुरी) जितेंद्र मकू, पोलादपूर (कालवली) दिपक जाधव, खालापूर (कांढरोली उर्फ वनखळवाडी) उमेश विचारे, म्हसळा (तोराडी उर्दू शाळा) इक्बाल अ. गफुर कौचाली, पेण (खारढोंबी) गजानन मोकल, कर्जत (माणगाव वरेडी) शिवाजी कावरे या प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला.
श्रीवर्धन (आदगाव) अनिल पाटील, अलिबाग (पोयनाड) उदय पाटील, महाड वि.ह.परांजपे विद्या मंदिर ज्ञानदेव साळवे, सुधागड-पाली (वावोशी) नरेश शेडगे, माणगाव (पन्हाळघर) निलीमा काप, तळा (बोरघर हवेली) विद्या मांडवकर, उरण (नेटीव्ह इन्स्टीट्युट) संजीव पाटील, म्हसळा (न्यु इंग्लीश स्कूल) मंगेश कदम, पेण (दादर) कमलाकर पाटील, पोलादपूर (ओंबळी) सुरेश साबळे, पनवेल (कोपरा) विजयकुमार बडगुजर, मुरुड (यशंवत नगर) विजयकुमार बनाटे, रोहे (कोलाड) अजय पाटील, खालापूर (वावोशी) मानसी काळे, कर्जत (अभिनव ज्ञान मंदिर) धुराजी शिंदे या माध्यमिक शाळेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.