सोलापुरात शाळेची बस उलटून चालकाचा मृत्यू, 30 ते 40 विद्यार्थी जखमी
By Admin | Updated: April 1, 2017 10:33 IST2017-04-01T09:18:25+5:302017-04-01T10:33:48+5:30
मंगळवेढा तालुक्यात शाळेच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसचालकाचा मृत्यू झाला असून 30 ते 40 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत

सोलापुरात शाळेची बस उलटून चालकाचा मृत्यू, 30 ते 40 विद्यार्थी जखमी
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 1- मंगळवेढा तालुक्यात शाळेच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसचालकाचा मृत्यू झाला असून 30 ते 40 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. जुनोनी माध्यमिक हायस्कूलची ही बस होती. विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना बस उलटून हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यात खड्डा आल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस पलटी झाली.
नंदेश्वर ते जुनोनी मार्गावरसकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर जखमी चालकाला रुग्णालयात नेलं जात असतानाचा त्याचा मृत्यू झाला. 30 ते 40 विद्यार्थी गंभीर जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.