शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पपयांमध्ये सापडले ३० कोटींचे ‘मेओ मेओ’

By admin | Updated: February 23, 2015 02:50 IST

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथून आलेल्या फळांच्या एका ट्रकमध्ये लपवून आणलेले ५०० किलो मेफेड्रॉन पकडून केंद्रीय वित्त

नवी दिल्ली : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथून आलेल्या फळांच्या एका ट्रकमध्ये लपवून आणलेले ५०० किलो मेफेड्रॉन पकडून केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरई) महाराष्ट्रातून चालविल्या जाणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. मेफेड्रॉनला हा अमली पर्दाथ ‘मेओ मेओ’ या नावानेही ओळखला जातो. भारतात या अमली पदाथाची मागणी अलीकडच्या काळात वाढली आहे. दिल्लीत पकडलेल्या मेफेड्रॉनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे ३० कोटी रुपये आहे.‘डीआरई’मधील सूत्रांनुसार हे मेफेड्रॉन सोलापूर जिल्हयातीलच एका अवैध कारखान्यात तयार केले गेले होते. या संदर्भात माहिती मिलाल्यानंतर कुर्डुवाडीहून फळे घेऊन रवाना झालेल्या या ट्रकवर अधिकारी नजर ठेवून होते. ट्रक दिल्लीला पोहोचताच त्याची तपासणी करण्यात आली. ट्रकमधील पपयांमध्ये एकूण ५०० किलो वजनाची मेफेड्रॉनची १३ पाकिटे मिळाली. मेफेड्रॉन तस्करीचा देशात आजवर पकडलेला हा सर्वात मोठा साठा असून ते पाश्चात्य देशांमध्ये पाठविण्यासाठी दिल्लीत धाडण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रक चालक व त्याच्या साथीदारास अटक करून साकेत न्यायालयात सादर केले आणि न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यांचे जबाब नोंदविले जात असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून मेफेड्रॉन तस्करीचे मोठे रॅकेट उघड होईल, अशी शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)