शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना उचलले; नाशिकमध्ये नजरकैदेत ठेवले
3
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
5
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
6
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
7
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
8
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
10
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
11
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
12
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
13
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
15
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
16
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
17
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
19
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
20
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत

कसाऱ्यात ३० तास "ब्लॅकआऊट", खंडित वीजपुरवठ्यामुळे व्यापाऱ्यांचे हजारोचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 4:45 PM

दुरूस्तीसाठी लागला ३० तासांचा कालावधी. शुक्रवारी सकाळी दुरुस्तीसाठी खंडित करण्यात आला होता वीजपुरवठा.

ठळक मुद्देदुरूस्तीसाठी लागला ३० तासांचा कालावधी.शुक्रवारी सकाळी दुरुस्तीसाठी खंडित करण्यात आला होता वीजपुरवठा 

शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा तब्बल ३० तासांनंतर आल्याने वीजग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडला. शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी व भारत पेट्रोलियम कॅर्पोरेशन कंपनी ने बी.पी.सी.एल. पॉवर हाऊसशी निगडित असलेल्या कसारा ,वाशाळा सह काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला होता. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेसाठी खडीत केलेला विज पुरवठा पूर्ववर्त् करण्यासाठी म. रा.वी.म व बि. पि. सी .एल कंम्पनीला अपयश आल्याने कसारा वासियांना तब्बल ३० तासांच्या ब्लॅकआऊटला समोरे जावे लागले.

सकाळी १० वाजेपासून दुरुस्ती कामाला वॉशाळा सब सेंटरला सुरुवात झाल्यानंतर महत्त्वाच्या हाय टेंशनच्या वायरी बदलण्याचे काम देखील हाती घेण्यात आले होते. परिणामी दुरुस्ती कामावेळी काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना रात्री उशिरा पर्यंत दुरुस्ती कामात अपयश आल्याने रात्री ११ वाजता पडघा ,भिवंडी येथील कर्मचाऱ्यांना सब सेंटरला पाचरण करण्यात आले. परंतु रात्रीचा अंधार व पाऊस या मुळे म. रा.वी.म आणि बी.पी.सी.एल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्ती मोहिमेत अडथळे निर्माण होत होते.

तज्ज्ञ अभियंते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या कमावेळी रात्री एकच्या दरम्यान अचानक घाटघर वीज प्रकल्पातून येणाऱ्या उच्चदाब वीज वाहिनीत  तांत्रिक बिघाड झाल्याने कर्मचाऱ्यांचे काम वाढले. रात्रभर काम करून देखील दुरुस्ती पूर्ववत न झाल्याने शनिवारी सकाळी घाटघर येथून येणारी उच्चदाब वीज वाहिनी बदलण्यात आली आणि शनिवारी दुपारी ३ वाजता कसाऱ्यासह अन्य भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तब्ब्ल ३० तासांनी वीज आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

२४ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कौतुकदरम्यान शुक्रवार सकाळी १० वाजेपासून दुरुस्ती कामासाठी झटत असलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र २४ तास मेहनत घेत तब्बल ३० तासांनी वीजपुरवठा सुरळीत केला. या विशेष कामगिरीचे  वीजग्राहकांकडून कौतुक केले जात आहे.

व्यापाऱ्यांचे हजारोचे नुकसानदरम्यान ३० तासाच्या ब्लॅकआउटमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः दुध, वैद्यकीय व्यवसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र