शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

स्वत:चे मतदान नसलेल्या मतदारसंघात १० मंत्री विजयी; आदित्य, आव्हाड, तटकरे यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 6:09 AM

विश्लेषण; ८ मंत्र्यांच्या गृहमतदारसंघात विरोधकांची बाजी

प्रेमदास राठोड मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमधील १० मंत्री हे स्वत: मतदार नसलेल्या दुसऱ्या मतदारसंघातून निवडून आले आहेत. यात खुद्द मुख्यमंत्रीपुत्र आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे आदींचा यात समावेश आहे. या १० पैकी ८ मंत्र्यांच्या स्वत:च्या गृहमतदारसंघात मात्र विरोधकांनी बाजी मारली आहे.

मुंबईतील वरळीमधून ६७ हजारांवर मताधिक्याने बाजी मारलेले मंत्री आदित्य ठाकरे उपनगरातील वांद्रे पूर्व या विधानसभा मतदार मतदारसंघातील मतदार आहेत. या वांद्रे पूर्व मतदारसंघात काँग्रेसचे झिशान बाबा सिद्दीकी यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे सिद्दीकी हेही अन्य मतदारसंघातील (वांद्रे पश्चिम) मतदार आहेत!

काँग्रेसचे दिग्गज मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण व अस्लम शेख हे मतदार असलेल्या गृहमतदारसंघात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. अहमदनगरच्या संगमनेरमधून ६२ हजाराच्या मताधिक्याने विजयी झालेले मंत्री बाळासाहेब थोरात (वय ६६) हे शेजारच्या शिर्डी मतदारसंघातील मतदार आहेत. शिर्डीतून थोरातांचे कट्टर विरोधक राधाकृष्ण विखे पाटील (वय ६०) विजयी झाले आहेत. थोरात यांच्या जोर्वे गावातील मतदान केंद्रावर काँग्रेसला ५९६ मते पडली तर विखे यांना ४५९ मते मिळाली. विखे पाटील हे शिर्डीमधीलच लोणीचे मतदार आहेत.

नांदेडच्या भोकरमधून ९७ हजारांच्या फरकाने बाजी मारलेले बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे शेजारच्या नांदेड उत्तर मतदारसंघातील मतदार आहेत. तेथे चव्हाण यांचे खास विश्वासू डी.पी. सावंत यांना शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांच्याकडून पराभूत व्हावे लागले.काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख हे मुंबई उपनगरातील मालाड पश्चिम मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. पण ते स्वत: मात्र शेजारच्या चारकोप मतदारसंघातील मतदार आहेत. चारकोपमध्ये भाजपाचे योगेश सागर यांनी बाजी मारली.

राष्ट्रवादीचे ६ मंत्री अन्य मतदारसंघातून विजयी झाले आहेत. या मंत्र्यांच्या गृहमतदारसंघात मात्र विरोधकांनी बाजी मारली. नाशिकच्या येवल्यातून ५६ हजारांच्या मताधिक्याने विधानसभेवर गेलेले राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ हे स्वत: नाशिक पश्चिम मतदारसंघातील मतदार आहेत. नाशिक पश्चिममध्ये भाजपाच्या सीमा हिरे यांनी राष्ट्रवादीच्या अपूर्वा हिरे यांचा पराभव केला. ठाण्याच्या मुंब्रा कळवा मधून ७५ हजारांवर मतांनी विजयी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड हे ठाणे मतदारसंघातील मतदार आहेत. येथे भाजपाचे संजय केळकर यांनी विजय मिळवला. एवढेच नव्हे तर आव्हाड यांच्या बुथवरही भाजपाने मोठी आघाडी घेतली. या मतदारसंघात भाजपाचे केळकर यांनी मनसेचा पराभव केला.

मुंबई उपनगरातील अनुशक्तिनगरमधून १२ हजारांच्या मताधिक्याने शिवसेनेचा पराभव केलेले राष्ट्रवादीचे नवाब मलिक हे स्वत: कलिना मतदारसंघातील मतदार आहेत. कलिनामध्ये मलिक यांच्या मित्रपक्षाला काँग्रेसला शिवसेनेने पराभवाची धूळ चारली. मलिक यांच्या बुथवर मात्र काँग्रेसला चांगली आघाडी मिळाली.

रायगडच्या श्रीवर्धनमध्ये ३९ हजाराच्या मताधिक्याने शिवसेनेला पराभूत केलेलेल्या राष्ट्रवादीच्या राज्यमंत्री आदिती तटकरे या शेजारच्या पेण मतदारसंघातील मतदार आहेत. येथे भाजपाचे रविशेठ पाटील यांनी विजय मिळवला. आदिती यांच्या बुथवर भाजपाला ३०९ तर शेकापला ३१५ मते मिळाली.लातूरच्या उदगिरमधून विजयी झालेले राष्ट्रवादीचे राज्यमंत्री संजय बनसोडे हे अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदारसंघातील मतदार आहेत. बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. पवार हे भाजपासोबत गेल्यानंतर दिल्लीकडे जाण्याच्या बेतात असलेले बनसोडे यांना शिवसेना नेत्यांनी पकडून शरद पवारांच्या सुपूर्द केले होते. बनसोडे यांच्या बुथवर काँग्रेसचे अमित देशमुख यांना चांगली आघाडी मिळाली आहे.

साताºयाच्या कराड उत्तरमधून ४९ हजाराच्या मताधिक्याने विजयी झालेले राष्ट्रवादीचे मंत्री बाळासाहेब पाटील हे शेजारच्या कराड दक्षिणचे मतदार आहेत. पाटील यांच्या बुथवर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना ७ मते जास्त पडली.विरोधकांनी बाजी मारलेले मंत्र्यांचे ८ गृहमतदारसंघनांदेड उत्तर (अशोक चव्हाण), चारकोप (अस्लम शेख), शिर्डी (बाळासाहेब थोरात), नाशिक पश्चिम (छगन भुजबळ), ठाणे (जितेंद्र आव्हाड), कलिना (नवाब मलिक), पेन (अदिती तटकरे), वांद्रे पूर्व (आदित्य ठाकरे)