288 जागा लढविणो आव्हानच

By Admin | Updated: October 4, 2014 02:18 IST2014-10-04T02:18:43+5:302014-10-04T02:18:43+5:30

एकत्रित लढण्याचा निर्णय दुर्दैवाने वास्तवात उतरला नाही. 125 ते 13क् जागांची आमची अपेक्षा होती. त्याऐवजी 285 जागा लढवण्याची वेळ आली.

The 288 contestants face the challenge | 288 जागा लढविणो आव्हानच

288 जागा लढविणो आव्हानच

>पुणो :  एकत्रित लढण्याचा निर्णय दुर्दैवाने वास्तवात उतरला नाही. 125 ते 13क् जागांची आमची अपेक्षा होती. त्याऐवजी 285 जागा लढवण्याची वेळ आली. त्यामुळे यंत्रणा उभी करावी लागली. परिणामी प्रचाराला मर्यादा आल्या, अशी कबुली राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. 1999नंतर राष्ट्रवादी पहिल्यांदाच एकटय़ाने निवडणुकांना सामोरा जात आहे. ही आव्हानात्मक परिस्थिती आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांना जनतेसमोर जाण्याची संधी मिळाली आहे, असेही पवार म्हणाले.  
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आघाडी व्हावी अशीच माझी भूमिका होती. दीड - दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी मी भेट घेतली तेव्हा त्या आघाडीविषयी सकारात्मक होत्या. राहुल गांधी यांचा याविषयीचा निर्णय काय होता हे माहिती नाही. पण तेव्हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या दोन ते तीन बैठका झाल्या. जागावाटपाचा प्रश्न असल्याने दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा विषय राज्यपातळीवर चर्चेला आला. त्या वेळी राष्ट्रवादीने 144 जागांची तसेच काही काळासाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने उमेदवारांची यादीही जाहीर केली. त्यात आमच्या वाटय़ाला सोडलेल्या काही जागांचाही समावेश होता. त्यामुळे आघाडी होण्यास अडचणी निर्माण झाल्या, असे ते म्हणाले.
संभाव्य मोदीलाटेबाबत ते म्हणाले, काँग्रेसने राहुल गांधी यांना तर भाजपाने नरेंद्र मोदी यांना प्रोजेक्ट केले होते. देशभर हे दोघेही फिरत होते. जनतेने मोदींच्या बाजूने कौल दिला. 
मात्र महाराष्ट्राचे प्रशासन चालवण्यासाठी मोदी येणार नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये 9पैकी 8 जागांवर भाजपाचा पराभव झाला हा बोलका ट्रेंड आहे. शेतमालाच्या किंमती कमी झाल्याने, निर्यातबंदी लागू झाल्याने तेथील शेतक:यांनी भाजपाच्या विरोधात निकाल दिला आहे.
 
दक्षिण कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उमेदवार उभा केला जावा, असे मला वाटत होते. परंतु, त्यांच्याविरोधात रिंगणात उतरलेल्या विलासकाका उंडाळकर यांना राष्ट्रवादीने पाठिंबा देण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्वानेच घेतला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. माङयाच उमेदवारांच्या प्रचारासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नाही. त्यामुळे उंडाळकर यांच्या प्रचारासाठी मात्र आपण जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
स्वबळावर सत्ता आणणार : अर्जुनाचे लक्ष जसे माशाच्या डोळ्यावर होते तसा मी फक्त स्वबळावर सत्ता आणण्याचाच विचार करतोय. निवडणुकीनंतर आघाडय़ांबाबतचा विचारही माङया डोक्यात सध्या नाही. एकाच पक्षाला बहुमत मिळावे ही माझी इच्छा आहे. लोक आमच्यापेक्षा शहाणो असतात. ते योग्य निर्णय घेतील. निवडणुकीनंतर आम्ही भाजपा किंवा शिवसेनेबरोबर जातोय असा आरोप करणा:या कॉँग्रेस नेत्यांचा सामाजिक आवाका आणि महाराष्ट्राबद्दलचे ज्ञान कमी दिसतेय, अशी टीका पवार यांनी केली. 

Web Title: The 288 contestants face the challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.