शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

१४५ शहरांतील प्रकल्पांना २८,३१५ कोटी मंजूर; महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 07:45 IST

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन २०३० पर्यंत राबविणार आहे.

नगरांच्या विकासासाठी अमृत २.० अभियानांतर्गत १४५ शहरांमधील २८ हजार ३१५ कोटींचे ३१२ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यात पाणीपुरवठा, मलनिस्सारण, सरोवर पुनरुज्जीवन आणि हरितक्षेत्र विकास प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन २०३० पर्यंत राबविणार आहे. यातून पाणीपुरवठा, मलनिस्सारण यांबरोबरच रेल्वे ओव्हरब्रिज, प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे करणार आहोत.

- महाअभियानात सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किमतीच्या ५० ते ९५ टक्के निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.

पाणीपुरवठाnसन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला ३ हजार ८७५ कोटी रुपयांची तरतूद.nदरवर्षी सुमारे २५ हजार किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड करणार.nजलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत ५ हजार ७०० गावांमधील १ लाख ५९ हजार ८८६ कामांना मंजुरी.

पर्यावरणnसन २०२४-२५ या वर्षासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाला २४५ कोटी रुपये.nवन विभागास २ हजार ५०७ कोटी रुपये - मृद व जलसंधारण विभागास ४,२४७ कोटी रुपयांची तरतूद.

महिला व बालविकासाला प्राधान्यबिजली चमकती हैे तो आकाश बदल देती है, आंधी उठती हैं तो दिन रात बदल देती है जब गरजती है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है अशी कविता वाचत अजित पवार यांनी  महिला आणि मुलींसाठीच्या योजना जाहीर केल्या.मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान एक लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात येणार आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांची रिक्त पदे भरणार कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्रे उभारणार, दहा मोठ्या शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार

वृक्षलागवड दरवर्षी सुमारे २५ हजार किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असून त्यासाठी तरतूद केली आहे.बांबूची लागवड अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्याची घोषणा करण्यात आली असून, त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानही दिले जाणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा