शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

२८ कोटींचे निधीवाटप, टक्केवारीत २५ कोटी गायब; शिंदेच्या निकटवर्तीयाचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 12:28 IST

शिवसेना वाचवण्यासाठीच आमचा हा खटाटोप केला. मात्र, राऊत यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले, अशी टीका मोरे यांनी केली.

मेघनाथ विशे पडघा : शिवसेना आणि हिंदुत्व हा आमचा श्वास असून, तोच दाबण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच्या सत्तेत असताना सुरू हाेता. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडण्याशिवाय आमच्यासमाेर दुसरा कोणताही पर्याय नव्हता, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी बुधवारी ‘लाेकमत’जवळ मांडली. आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहाेत. 

विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी ठाण्यापर्यंत आलो, तोपर्यंत आम्हाला याबाबत अजिबात कल्पना नव्हती. आम्ही पाच ते सहा आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत होतो. आम्ही तलासरीमार्गे सुरतच्या दिशेने निघालो. मात्र, महाराष्ट्र-गुजरात सीमेवर चेक पोस्टवर नाकाबंदी असल्याने आम्ही आडमार्गाने गुजरातमध्ये पोहोचलो, असे मोरे यांनी सांगितले. यादरम्यान सर्वांकडील मोबाइल सुरक्षा व गोपनीयतेच्या कारणास्तव जमा करण्यात आले हाेते. त्यामुळे जिल्हाप्रमुखांनाही कल्पना  मी देऊ शकलो नसल्याचे ते म्हणाले. 

संजय राऊत यांनी आगीत तेल ओतले ! खासदार संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे. आमच्याच मतांवर निवडून येणाऱ्या  या व्यक्तीने राजीनामा देऊन आमच्यावर टीका केली. आमच्याबाबत बळीचे रेडे, डुक्कर, वेश्या असे घाणेरडे शब्दप्रयोग त्यांनी केले. मुळात आम्ही काेणत्याही पदाकरिता बंड केलेलेच नाही, तर शिवसेना वाचवण्यासाठीच आमचा हा खटाटोप केला. मात्र, राऊत यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले, अशी टीका मोरे यांनी केली.

मंत्रालयात टक्केवारी घेऊन सुरू हाेते निधीवाटप!आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी भिवंडी ग्रामीण मतदारसंघासाठी २८ कोटी रुपये दिले. मात्र, प्रत्यक्षात अवघे तीन कोटीच देण्यात आले. उर्वरित सर्व निधी हा काँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना तसेच ठेकेदारांना त्यांच्या मागणीनुसार देण्यात आला. मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर टक्केवारी घेऊन निधीवाटप केला जात होता, असा आराेपही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस