२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 06:35 IST2025-05-05T06:35:18+5:302025-05-05T06:35:41+5:30
सर्व गैरप्रकारांमुळे सीईटी सेलने शेवटच्या सत्रातील ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला.

२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २७,८३७ विद्यार्थ्यांची एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा सोमवारी घेण्यात येणार आहे. त्याबाबत विद्यार्थ्यांना यापूर्वीच प्रवेशपत्र पाठविण्यात आले आहे.
एमएचटी सीईटी एकूण १६ सत्रात घेण्यात आली असून पीसीएम ग्रुपच्या शेवटच्या सत्राची परीक्षा २७ एप्रिलला झाली. मात्र, या परीक्षेत २१ प्रश्न चुकीचे दिल्याचा प्रकार घडला होता. परिणामी, विद्यार्थी आणि पालकांनी ई-मेल, दूरध्वनी आणि प्रत्यक्ष भेटून सीईटी सेलकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून सीईटी सेलला टीकेलाही सामोरे जावे लागले होते. त्यानुसार सीईटी सेलने केलेल्या पडताळणीत पेपर तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून भाषांतरणावेळी चुका झाल्याचे समोर आले. तसेच काही प्रश्नांना अन्य प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय दिल्याचे प्रकारही घडले होते.
या सर्व गैरप्रकारांमुळे सीईटी सेलने शेवटच्या सत्रातील ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला.