शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

सोळा उमेदवारांचे २७ अर्ज

By admin | Updated: January 18, 2017 06:20 IST

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.

ठाणे : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. विभागातून १६ उमेदवारांनी २७ अर्ज दाखल केले आहेत. १८ जानेवारी रोजी या अर्जांची छाननी होणार आहे. काही उमेदवारांनी दोन - दोन अर्ज दाखल केल्यामुळे उमेदवारी संख्या वाढलेली आहे. यातील बहुतांशी अर्ज २० जानेवारीनंतर मागे घेतले जाणार आहेत. त्यानंतरच निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या निश्चित करणे शक्य होणार आहे. यामध्ये तिसऱ्यांदा नशिब अजमावित असलेले शिक्षक भारतीचे उमेदवार अशोक बेलसरे (बदलापूर) यांचा उमेदवारी अर्ज आहे. भाजपाचा पाठिंबा मिळवून शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू (बदलापूर) निवडणूक रिंगणात आहेत. शिक्षक परिषदेने उमेदवारी नाकारल्यामुळे या मतदार संघाचे विद्यमान आमदार रामनाथ मोते (उल्हासनगर) यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारांसह सेनेच्या पाठिंब्यावर शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे (अंबरनाथ), शेकापचे नेते पुरोगामी शिक्षक आघाडीचे बाळाराम पाटील (रायगड) यांचा उमेदवारी अर्ज आहे. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे नरसू पाटील (उरण) आदींसह अपक्ष उमेदवार केदार जोशी (ठाणे), कृष्णा म्हात्रे, काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सुळे (ऐरोली), राजाराम पाटील (कल्याण), मिलिंद कांबळे (उल्हासनगर), आंबादास काळे (विचुंबे, पनवेल), उस्मान रोहेकर (रोहा), दिलीप गव्हाळे (वासिंद), तुळशिराम जाधव (भांडूप) इत्यादी १६ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केले. या उमेदवारी अर्जांची छाननी कोकण भवन येथील आयुक्त कार्यालयातील समिती सभागृहात होणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेपासून छाननी केली जाणार आहे. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर देशमुख व सहाय्यक निर्णय अधिकारी शिवाजी काटबाणे यांच्या नियंत्रणात ती होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. >निवडणूक निरीक्षकपदी डॉ. जगदीश पाटीलनवी मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या वतीने नुकताच द्विवार्षिक निवडणूक २०१७ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकपदी डॉ. जगदीश पाटील (भा.प्र.से.) महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम यांची निवड करण्यात आली आहे. उपायुक्त (विकास) दालन, विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, सीबीडी बेलापूर येथे कार्यालयीन वेळेत पाटील उपलब्ध राहतील असे स्पष्टीकरण सहा. निवडणूक अधिकाऱ्यांनी केले. कोकण विभाग शिक्षक मतदार संघामधील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये माध्यम प्रामाणिकरण व सनियंत्रण समिती, स्थायी समिती, तक्रार निरीक्षण कक्ष तसेच कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील प्रत्येक तालुक्यातील विशेष चित्रीकरण पथके आणि भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकण विभाग मतदार संघातील तक्रार निरीक्षण कक्षकोकण विभाग - प्रभारी अधिकारी दीपक वानखेडे,नायब तहसीलदार,विभाग आयुक्त कार्यालय,कोकण भवन, नवी मुंबईपालघर - प्रभारी अधिकारी किरण महाजन,उपजिल्हा निवडणूक अधिकारी,पालघरठाणे- प्रभारी अधिकारी मनोज मुरकर, जनसंपर्क अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणेरायगड- प्रभारी अधिकारी रवींद्र चव्हाण, नायब तहसीलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय, रायगडरत्नागिरी - प्रभारी अधिकारी अर्चना गोखले, नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरीसिंधुदुर्ग - प्रभारी अधिकारी प्रवीण खाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदुर्ग