कसाबसोबतच्या कटू आठवणी पुस्तकातून उलगडणार....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 17:32 IST2018-11-16T16:46:02+5:302018-11-16T17:32:43+5:30
तपास अधिकारी रमेश महालें यांचे '26/11 कसाब आणि मी' पुस्तक

कसाबसोबतच्या कटू आठवणी पुस्तकातून उलगडणार....
मुंबई - 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संबंध देश हादरून गेला होता. 26/11 या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत सापडलेला अजमल कसाब या आतंकवाद्याची चौकशीची धुरा तपास अधिकारी रमेश महाले यांनी सक्षमपणे सांभाळली. याच रमेश महाले यांचे 26/11 मी आणि कसाब या पुस्तकाचा 25 नोव्हेंबरला प्रकाशन सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघात सायंकाळी 5.15 वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आणि मुंबई पोलीस दलाच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
81 दिवस रमेश महाले यांनी मुंबईत घुसलेल्या 10 दाहशतवाद्यांपैकी जिवंत सापडलेल्या कसाबची कसून चौकशी केली. 26/11 या मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यातील पहिलाच दहशतवादी आहे त्याची चौकशी महाले यांनी त्यांनी संपूर्ण पोलीस सर्व्हिस काळात केलेले महत्वपूर्ण जबाबदारी होती असे महाले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या चौकशीदरम्यान आलेले अनेक अनुभव आणि किस्से महाले यांनी या पुस्तकातून 10 वर्षांनी मांडले आहेत