अंधेरीच्या लोटस बारमधून २४ तरुणींना अटक
By Admin | Updated: December 30, 2015 14:30 IST2015-12-30T09:41:48+5:302015-12-30T14:30:30+5:30
बईत अंधेरीतील लोटस बारवर मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा मारुन २४तरुणींना अटक केली.

अंधेरीच्या लोटस बारमधून २४ तरुणींना अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - मुंबईत अंधेरीतील लोटस बारवर मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा मारुन २४तरुणींना अटक केली. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बारमध्ये अनैतिकता सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारावर पोलिसांनी छापा मारुन कारवाई केली.
नियमानुसार ऑर्केस्ट्रामध्ये फक्त चार तरुणी काम करु शकतात मात्र याठिकाणी १२ तरुणी सापडल्या. पोलिसांना आणखी काही तरुणी बारमध्ये असाव्यात असा संशय आला. अधिक तपासणी केली असता गुप्त खोलीमध्ये आणखी १२ जणी लपून बसल्या होत्या. पोलिसांनी लोटस बारला टाळ लावलं असून, बारच्या मालक आणि व्यवस्थापकाचा शोध सुरु केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच मुंबईतील डान्सबारवर असलेली बंदी उठवण्याचे आदेश दिले. पुन्हा डान्सबार सुरु करण्यासाठी पोलिसांनी कठोर अटी घालूनही मुंबईत डान्सबारच्या परवान्यासाठी १५० अर्ज पोलिसांकडे आले आहेत.