शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्रात 2200 कारखाने बंद, बेरोजगारी 250 टक्क्यांनी वाढली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 16:58 IST

सध्या कमाई कुणाची होतंय? कामगार, मजूर, शेतकरी देशोधडीला लागला असून सरकमधील मंत्रीगणांचा विकास होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील बारड येथे भोकर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेला संबोधित करताना, ज्योतिरादित्य यांनी मराठीतून सुरुवात केली. मराठीतून सुरुवात केल्यानंतर माझे आणि तुमचे, माझे आणि महाराष्ट्राचे कौटुंबिक संबंध आहेत. देशातील काही मातींशी माझा संबंध असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या मातीशी माझा संबंध असल्याचे शिंदेंनी म्हटले.

ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी बारड येथील सभेत अशोक चव्हाण यांचे कौतुक करत ते जनसेवक असल्याचे म्हटले. राजकारणापेक्षा जनसेवेला चव्हाण कुटुंबीयांना प्राधान्य दिलंय. आज मी ज्या माणसाच्या प्रचारासाठी आलोय, त्यांचं मन आणि बुद्धी दोन्हीही दुधाप्रमाणे पांढरंशुभ्र असल्याचं शिंदेंनी म्हटलं. भाजपा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. तर, पाण्याच्या नावावरुनही राजकारण करण्यात येत आहे. गेल्या 5 वर्षात औद्योगिकरणाचा दर 50 टक्क्यांनी घसरला असून 2 हजार दोनशे कारखाने, पुण्यापासून मुंबईपर्यंत, मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत बंद झाले आहेत, या कारखान्यांना टाळे लागल्याचं ज्योतिर्रादित्य शिंदेंनी सांगिलंय. 

सध्या कमाई कुणाची होतंय? कामगार, मजूर, शेतकरी देशोधडीला लागला असून सरकमधील मंत्रीगणांचा विकास होत आहे. भाजपा सरकारमुळे साक्षर तरुणाचे पदवीचे प्रमाणपत्र हे बेरोजगारीच्या प्रमाणपत्रात बदलले आहे, असा आरोप शिंदेंनी केला. बेरोजगारी 250 टक्क्यांनी वाढली असून शिपायाच्या नोकरीसाठी पदवी आणि पदव्युत्तर तरुणांना अर्ज करावा लागत असल्याचं शिंदेंनी म्हटलं.  दरम्यान, घासल्याशिवाय धार नाही तलावारीच्या पातीला आणि अशोक चव्हाणांशिवाय पर्याय नाही बारडच्या मातीला, अशी एका वाक्यातील घोषणा देऊन ज्योतिर्रादित्य शिंदेंनी आपल्या भाषणाची सांगता केली.  

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणbhokar-acभोकरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक