शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २२ जिल्हा बँका व ८ हजार विकास सोसायट्यांच्या निवडणुका तीन महिने पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 17:50 IST

निवडणुकीसोबतच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी समांतर पधदतीने राबविल्यास कर्जमाफी योजनेत अडथळा येण्याची शक्‍यता..

ठळक मुद्देशासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू विद्यमान संचालकांना तीन महिने मुदतवाढ मिळाली

पुणे : राज्यातील कर्जमाफी योजना व जिल्हा बँक तसेच सहकारी सोसायटीच्या निवडणुका समांतर पध्दतीने राबविल्यास कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत अडचणी येण्याची शक्‍यता आहे . त्यामुळे राज्यातील २२ जिल्हा बँकाची निवडणुक व सुमारे ८ हजार विकास सोसायटीच्या निवडणुका राज्य शासनाने तीन महिने पुढे ढकलल्या आहे. शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विविध विभागाचे क्षेत्रिय अधिकारी व्यस्त आहेत. निवडणुकीसोबतच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी समांतर पधदतीने राबविल्यास कर्जमाफी योजनेत अडथळा येण्याची शक्‍यता असल्याने व संचालक मंडळाची निवडणुक ही वैधानिक जबाबदारी असल्याने कर्जमाफी योजनेत विलंब होईल व खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेल्या बँका व गावपातळीवरील सहकारी सोसायटी वगळून उर्वरित सहकारी बँका व सोसायट्यांची निवडणुक तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यमान संचालकांना तीन महिने मुदतवाढ मिळाली आहे.

राज्यातील ३१पैकी २२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, २१ हजार २२५ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांपैकी ८१९४ संस्थांची निवडणुक जानेवारी ते जून या कालावधीत होणार होती. या संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी राज्य सहकार निवडणुक प्राधीकरणाकडे आहे.ज्या संस्थांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशा संस्था वगळून उर्वरित सर्व सहकारी बँका व विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुका शासनाने तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या संस्थांच्या संचालकांना तीन महिने मुदतवाढ मिळाली आहे

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारbankबँकFarmerशेतकरी