शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

देहू, आळंदी, पंढरपूरला २१२ कोटीचे अर्थसहाय्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:13 IST

देहू, आळंदी, पंढरपूरच्या विकासासाठी १ हजार ९४ कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी ७४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

मुंबई : देहू, आळंदीपंढरपूर या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी २१२ कोटी रुपये तर सेवाग्रामच्या (जि.वर्धा) १७ कोटी रुपये यंदा देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका बैठकीत सांगितले.देहू, आळंदी, पंढरपूरच्या विकासासाठी १ हजार ९४ कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी ७४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. त्यातील ७११ कोटी रुपयांची कामे झालेली आहेत. यावर्षी नव्याने २१२ कोटी रुपये देऊन विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, विजय देशमुख आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.सेवाग्राम, पवनार, वरुड या स्थळांचा पूर्ण विकास करण्यासाठी एकूण १७० कोटींचा आराखडा मांडण्यात आला आहे. तेथे रस्ते निर्माण, मलनि:स्सारण, धाम नदीवर घाट निर्माण, सौरऊर्जा, सुशोभीकरण आदी कामांसाठी नव्याने अतिरिक्त १७ कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला. सेवाग्राम येथे सुशोभीकरण कामासाठी जे जे आर्ट्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार असून याठिकाणी चरखा म्युझियम करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :dehuदेहूAlandiआळंदीPandharpurपंढरपूर