बोर्डाच्या लेखी परीक्षेत २० टक्के गुण अनिवार्य

By Admin | Updated: November 19, 2014 10:23 IST2014-11-19T10:23:52+5:302014-11-19T10:23:52+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावी लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे.

20% marks mandatory in the written examination of the Board | बोर्डाच्या लेखी परीक्षेत २० टक्के गुण अनिवार्य

बोर्डाच्या लेखी परीक्षेत २० टक्के गुण अनिवार्य

दहावी-बारावी : मार्च २०१६पासून निर्णय

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावी लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. लेखी परीक्षेत २0 टक्के म्हणजेच १६ गुण विद्यार्थ्याला मिळवावे लागणार असून, हा निर्णय मार्च २0१६पासून लागू केला जाणार आहे.
सध्या दहावीची तोंडी परीक्षा २0 गुणांची, तर लेखी परीक्षा ८0 गुणांची घेण्यात येते. बारावीला ३0 गुणांची तोंडी वा प्रात्यक्षिक आणि ७0 गुणांची लेखी परीक्षा असते. परंतु नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत १६ गुण मिळवावे लागणार आहेत. दहावीच्या तोंडी परीक्षेत विद्यार्थ्याला २0पैकी २0 गुण मिळाले आणि तोंडी तरीक्षेत १५ गुण मिळाले तर विद्यार्थी पास होत असे. मात्र, नवीन नियमानुसार असे ३५ गुण मिळालेला विद्यार्थी उत्तीर्ण मानला जाणार नाही. विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत १६ गुण मिळवावे लागणार आहेत. परीक्षा पद्धतीमधील बदलाबाबतच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने हा निर्णय मार्च २0१६च्या परीक्षेपासून लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले.

Web Title: 20% marks mandatory in the written examination of the Board