पाच रुपयांत 20 लीटर शुद्ध जल
By Admin | Updated: November 12, 2014 01:29 IST2014-11-12T01:29:19+5:302014-11-12T01:29:19+5:30
दूषित पाण्यामुळे अनेक आजार उद्भवतात. ग्रामीण भागात स्वच्छ पाणी सहजतेने उपलब्ध होत नाही. नाशिकमधील लाखलगाव मात्र त्यास अपवाद ठरले आहे.

पाच रुपयांत 20 लीटर शुद्ध जल
गणोश धुरी - नाशिक
दूषित पाण्यामुळे अनेक आजार उद्भवतात. ग्रामीण भागात स्वच्छ पाणी सहजतेने उपलब्ध होत नाही. नाशिकमधील लाखलगाव मात्र त्यास अपवाद ठरले आहे. लाखलगाव ग्रामस्थांनी एका अमेरिकी कंपनीच्या साहाय्याने 5 रुपयांत 2क् लीटर शुद्ध पाणी पुरवण्याचा उपक्रम गेल्या तीन महिन्यांपासून यशस्वीरीत्या राबविला आहे.
नाशिक तालुक्यातील लाखलगाव ग्रुप गामपंचायत, लाखेश्वर शुद्ध पाणीपुरवठा व स्वच्छता समिती तसेच अमेरिकेच्या मोन्सेन्टो कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिला आणि राज्यातील दुसरा वॉटर एटीएम कार्डचा प्रयोग लाखलगावला 6 सप्टेंबर 2क्14पासून सुरू झाला. लाखेश्वर पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सरपंच आत्माराम दाते, उपाध्यक्ष बाळासाहेब कांडेकर, सचिव गणपत कानडे यांच्या प्रयत्नातून प्रकल्प उभा राहिला. सुरुवातीला पाच महिने ग्रामस्थांना पाणी मोफत देण्यात आले.
मात्र हे पाणी पिण्यासाठी नव्हेतर सांडपाणी म्हणून वापरण्यात येत असल्याचे समितीच्या लक्षात आल्यावर जून 2क्14पासून 5 रुपयांची पावती फाडून 2क् लीटर पाणी देण्यात येऊ लागले. मात्र त्यासाठी मनुष्यबळ आणि वेळ वाया जाऊ लागला. त्यावर तोडगा म्हणून मग थेट वॉटर एटीएम संकल्पना अमेरिकन कंपनीच्या सहकार्याने 6 सप्टेंबर 2क्14पासून सुरू झाली. 1क्क् व 2क्क् रुपयांची दीडशे कुटुंबीयांना अडीचशे एटीएम कार्ड वितरित करण्यात आली.
प्रकल्पाचे फायदे
प्रकल्प सुरू झाल्यापासून पाण्यापासून होणा:या आजाराचे प्रमाण जवळपास शून्य झाले. आठ ते दहा गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो.
महिनाभरात दोन रुपयांत थंड पाणी : पाच रुपयांत 2क् लीटर शुद्ध पाणी देण्याच्या प्रयोगातून समितीस महिन्याकाठी 1क् ते 12 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. आता महिनाभरात नाशिक-औरंगाबाद महामार्गावर लाखलगाव बसस्थानकावर दोन रुपयांत थंड पाण्याची बाटली देण्याची योजना आहे.
असा आहे प्रकल्प़़़ : प्रकल्पाची किंमत साडेआठ लाख. एकावेळी दोन हजार लीटर्स पाणीपुरवठय़ाची क्षमता. 15क् कुटुंबे वॉटर एटीएमचे लाभधारक. 1क् हजार लीटर्स क्षमतेची पाण्याची टाकी.