शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शंभर दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:46 IST

ग्रामविकास मंत्रालयाचा पदभार स्वीकारला

सातारा : ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागासाठी विविध संकल्पना राबवून या खात्याचे नाव उंचावण्यावर भर देणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार येणाऱ्या १०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.मंत्रालयात मंगळवारी महापुरुषांना अभिवादन करून जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास खात्याचा पदभार स्वीकारला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राहुल कुल, आमदार सचिन पाटील, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अंकुशभाऊ गोरे, सोनिया गोरे, अरुण गोरे, भीमराव पाटील, किरण बर्गे, ओएसडी नारायण गोरे, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी, ऋषी धायगुडे, वैष्णवी गोरे, अदित्यराज गोरे आणि अधिकारी उपस्थित होते.

गोरे म्हणाले, माझा मतदारसंघ ग्रामीण भागात आहे. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे. ग्रामीण भागाच्या विकासाबरोबर माझी नाळ जुळली आहे. गेली १५ वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना गावगाड्याबरोबर जोडला गेलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मला याच विभागासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. येणाऱ्या काळात मंत्रिपदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सोयीसुविधा आणखी सुधारण्यावर भर देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी १०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देण्यात येणार आहे. १०० दिवसांच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ठेवून वेगाने निर्णय घेऊन ग्रामविकासाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी लखपती दीदी योजना प्रभावीपणे राबवून हे उद्दिष्ट १०० दिवसांत पूर्ण करणार आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणखी ५० लाख लखपती दीदी होणार आहेत.

पदभार स्वीकारताच सुरू केला कामाचा धडाकाजयकुमार गोरे यांनी ग्रामविकास मंत्रालयाचा पदभार स्वीकारताच कामांचा धडाका सुरू केला. ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांना सूचना करून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचा रोडमॅप तयार केला. त्यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारताच माण-खटावसह जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJaykumar Goreजयकुमार गोरेHomeसुंदर गृहनियोजन