शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

मुंबईत २ ते ५ एफएसआय

By admin | Updated: April 28, 2016 05:46 IST

सुधारित विकास नियोजन आराखड्यात विकासकांवर चटईक्षेत्र निर्देशांकांची खैरात करण्यात आली आहे़

मुंबई: सुधारित विकास नियोजन आराखड्यात विकासकांवर चटईक्षेत्र निर्देशांकांची खैरात करण्यात आली आहे़ पूर्वी १ ते ३़५ पर्यंत असलेला एफएसआय आता २ ते पाचपर्यंत दिला जाणार आहे़ तसेच व्यावसायिक बांधकामांना विशेष प्रोत्साहन देऊन पूर्वी ३़५ पर्यंत असलेला एफएसआय सरसकट पाच करण्याची शिफारस आराखड्यातून करण्यात आली आहे़सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी नियोजन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे़ मात्र या आराखड्याच्या मसुद्यामध्ये असंख्य त्रुटी आढळून आल्याने सर्वत्र तीव्र पडसाद उमटले़ अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आराखड्याच्या मुसद्याला स्थगिती देऊन सुधारणेचे आदेश दिले़ त्यानुसार सुधारित आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे़ या आराखड्यातील तरतुदी पालिकेच्या संकेतस्थळावरुन नागरिकांसाठी खुले करण्यात येत आहे़ याबाबत पालिका आयुक्त अजोय मेहता व विशेष अधिकारी रामनाथ झा यांनी पत्रकारांना माहिती दिली़ त्यानुसार पूर्वी शहरातील इमारतींसाठी एक आणि उपनगरांसाठी १़३३ असलेला एफएसआय थेट दोन करण्यात येणार आहे़ व्यावसायिक बांधकामांना प्रोत्साहनव्यावसायिक सरसकट पाच एफएसआय दिला जाणार आहे़ सर्व तारांकित हॉटेलसाठी पूर्वी ३ ते साडेतीन असलेला एफएसआय आता पाचपर्यंत दिला जाणार आहे़ जकात उत्पन्न वर्षागणिक कमी होत असल्याने हे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी पालिकेने या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याची तयारी सुरु केली आहे़ पालिकेला सर्वसाधारण पाच हजार कोटी वार्षिक उत्पन्न मिळत असते़ व्यावसायिक बांधकामांना प्रोत्साहन दिल्यानंतर हे उत्पन्नाबरोबरच मुंबईत रोजगारही वाढणे अपेक्षित असल्याचे आयुक्त अजय मेहता यांनी स्पष्ट केले़ आरे कॉलनीचे आरक्षण रद्दआरे कॉलनीमध्ये कारशेडसाठी ३० हेक्टर्स जागा तेही सरकारने निश्चित केल्यास राखीव ठेवण्यात येणार आहे़ इतर प्रस्तावित विकास रद्द करण्यात आले आह़े त्यामुळे आरे कॉलनीतील ना विकास क्षेत्र खुले करण्यावरुन पेटलेला वाद संपुष्टात आणण्यात आला आह़े मात्र अडीशे हेक्टर्स जागा झुओलॉजिकल पार्कसाठी राखीव ठेवण्यात आली आह़े.  दहा लाख घरांसाठी २१०० हेक्टर जमीनमुंबईत २०२१ पर्यंत लोकसंख्या १२़७९ दशलक्ष असणार आहे़ अल्प उत्पन्न व मध्यमवर्गीय मुंबईकरांना परवडणारी घर उपलब्ध करुन देण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे़ त्यानुसार दहा लाख परवडणारी घर बांधण्यात येणार आहे़ यासाठी ना विकास क्षेत्रात राखीव २१०० हेक्टर्स जागा परवडणाऱ्या घरांसाठी मिळविण्यात येणार आहे़

 

व्यावसायिक एफएसआय कमी पडत होता़ मुंबईत जादा रोजगार वाढविण्यासाठी व्यावसायिक एफएसआय वाढविणो महत्त्वाचे होत़े हा प्रोत्साहन देण्यामागे अधिक व्यवसाय मुंबईकडे आकृष्ट करणो, हेच उद्दिष्ट आह़े

विकास नियोजन आराखडय़ातील महत्त्वाचे मुद्दे

च्नवीन तीन हजार हेक्टर जमीन ही परवडणारी घरे आणि मोकळ्या जागांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आह़े यासाठी ना विकास क्षेत्र, मिठागरे, पर्यटन विकास क्षेत्र, मुंबई पोर्ट ट्रस्ट या माध्यमातून या जमिनीचा वापर होईल.

च्फंजीबल एफएसआय, एफएसआयमध्ये सुसूत्रता या माध्यमातून वर्षाला पाच हजार कोटी रुपये महापालिकेला मिळण्याचा अंदाज आह़े

च्आरक्षित जमिनी पालिकेच्या ताब्यात देण्यासाठी जमीन मालकाला पैसे न देता जादा एफएसआय आणि विकास हस्तांतरण हक्क म्हणजेच टीडीआर देण्यात येणार आहेत़ यामुळे आरक्षण असलेल्या पूर्वीच्या जमिनीही पालिकेच्या ताब्यात येतील़

च्पार्किगची समस्या मोठय़ा प्रमाणात असल्याने नव्याने पार्किग प्राधिकरण नेमण्याची शिफारस आराखडय़ातून करण्यात आली आह़े त्यामुळे मुंबईत नव्या पार्किगच्या जागा तयार होतील़ देशात अशाप्रकारे पार्किग प्राधिकरण पहिल्यांदाच नेमण्यात येणार आह़े

च्नव्या विकास आराखडय़ाच्या माध्यमातून 8क् लाख रोजगार तयार होणार आह़े

च्मुंबईत सार्वजनिक मोकळ्या जागांमध्ये वाढ केली जाईल. 

च्पूर्वी 32 मी़र्पयत असलेल्या इमारतींना हायराईज म्हटले जात होत़े मात्र आता 24 मी़ उंचीच्या इमारती हायराईज म्हणून गणल्या जाणार आहेत़