शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार? टास्क फोर्सने दिली संमती, आज निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 06:26 IST

मुले आजारी पडण्याचे प्रमाण जास्त नाही. रोज ७०० ते ८०० नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यात मुलांची संख्या नाममात्र असल्याने पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगून टोपे म्हणाले की, पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येऊ द्यायला हवे, अशी सूचना टास्क फोर्सने केली आहे.

मुंबई : मुलांच्या आरोग्यासाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सने पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याला हिरवा कंदील दिला आहे. आरोग्य विभागानेही त्यास मान्यता दिली. आता शाळा कधी सुरू करायच्या याचा अंतिम निर्णय उद्या, गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मुले आजारी पडण्याचे प्रमाण जास्त नाही. रोज ७०० ते ८०० नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यात मुलांची संख्या नाममात्र असल्याने पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगून टोपे म्हणाले की, पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येऊ द्यायला हवे, अशी सूचना टास्क फोर्सने केली आहे. आरोग्याबरोबरच मुलांच्या मनोवस्थेचाही विचार व्हायला हवा, अशी सूचना टास्क फोर्सने केली आहे. आरोग्याचे सर्व नियम पाळून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करायला परवानगी देण्याची टास्क फोर्सची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवली आहे. १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले पाहिजे, यावर टास्क फोर्स आग्रही आहे. ही बाब केंद्र सरकारलाही कळविण्यात आली आहे. केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर या वयोगटाच्या मुलांचेही लसीकरण सुरू केले जाईल.

टोपे म्हणाले...- तिसरी लाट अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या तीन देशांमध्ये घातक ठरलेली आहे. - आपल्याकडे रेस्टॉरंट, धार्मिक ठिकाणे आणि राजकीय सभांमध्ये गर्दी वाढत आहे. परंतु आपण बेफिकिरी करून चालणार नाही.- मुख्यमंत्री ठाकरे यांची तब्येत चांगली आहे. फिजिओथेरपी सुरू असून, गुरुवारी ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित असतील. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीRajesh Topeराजेश टोपेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस