१९ वर्षांच्या आरोपीकडून १९ मोबाइल जप्त

By Admin | Updated: September 18, 2016 01:21 IST2016-09-18T01:21:45+5:302016-09-18T01:21:45+5:30

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांचे मोबाइल पळविणाऱ्या सराईत चोरट्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली

19 mobile accused seized from accused | १९ वर्षांच्या आरोपीकडून १९ मोबाइल जप्त

१९ वर्षांच्या आरोपीकडून १९ मोबाइल जप्त


मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांचे मोबाइल पळविणाऱ्या सराईत चोरट्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली. महमद हाफिज मोहम्मद हनीफ (१९) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १९ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
मूळचा उत्तर प्रदेशचा हनीफ सणासुदीच्या काळात मुंबईत यायचा. शुक्रवारी रेल्वे पोलिसांनी गस्तीदरम्यान घेतलेल्या त्याच्या अंगझडतीत १९ मोबाइल सापडले. हनीफ अभिलेखावरील आरोपी असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. चोरीस गेलेले मोबाइल त्याने रेल्वे स्थानक तसेच मिरवणुकीदरम्यान चोरल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, मोबाईल चोरीच्या १८३ घटना काळाचौकी पोलीस ठाण्यात समोर आल्या आहेत. काळाचौकीतच १२ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अंजली नायडू या महिलेला अटक केली. मोबाईल चोरीप्रकरणी १८ जणांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 19 mobile accused seized from accused