अकोला-नारखेर-अकोलासाठी १८२ फेऱ्या

By Admin | Updated: September 11, 2015 03:30 IST2015-09-11T03:30:19+5:302015-09-11T03:30:19+5:30

प्रवाशांची वाढती मागणी पाहता मध्य रेल्वेकडून अकोला-नरखेर-अकोलासाठी १८२ विशेष फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २0१५ पर्यंत या ट्रेन धावतील.

182 rounds for Akola-Narkher-Akola | अकोला-नारखेर-अकोलासाठी १८२ फेऱ्या

अकोला-नारखेर-अकोलासाठी १८२ फेऱ्या

मुंबई : प्रवाशांची वाढती मागणी पाहता मध्य रेल्वेकडून अकोला-नरखेर-अकोलासाठी १८२ विशेष फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २0१५ पर्यंत या ट्रेन धावतील.
ट्रेन नंबर 0१३0७ अकोलाहून १६ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत १८.४५ वाजता सुटेल आणि नरखेर येथे त्याच दिवशी २३.१0 वाजता पोहोचेल. सोमवार सोडता ही ट्रेन अन्य दिवशी धावेल. या ट्रेनच्या ९२ फेऱ्या होतील. त्याचप्रमाणे ट्रेन नंबर 0१३0८ नरखेरहून १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत ४.३0 वाजता सुटेल आणि अकोला येथे त्याच दिवशी ९.0५ वाजता पोहोचेल. या दोन्ही ट्रेन आरक्षित ट्रेन असणार आहेत. ११ सप्टेंबरपासून या ट्रेनचे आरक्षण सुरु होईल,अशी माहीती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: 182 rounds for Akola-Narkher-Akola