शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

लॉकडाऊनमध्ये १७,७१५ बेरोजगारांना मिळाला रोजगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 06:30 IST

नवाब मलिक : कौशल्य विकास विभागाच्या आॅनलाइन मेळाव्यांसह महास्वयम वेबपोर्टलमुळे झाले शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असतानाही मागील ३ महिन्यांत कौशल्य विकास विभागाने आॅनलाइन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. या कालावधीत कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी दिली.

मलिक म्हणाले की, ‘बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने वेबपोर्टल सुरू केले आहे. त्यावर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हेसुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. मागील ३ महिन्यांत एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली.

यामध्ये मुंबई विभागातील २४,५२०, नाशिक ३०,१४५, पुणे ३७,५६२, औरंगाबाद ३५,२४३, अमरावती १४,२६० तर नागपूर विभागातील ३०,४३५ उमेदवार आहेत. यापैकी १७,१३३ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले. यात मुंबई विभागातील ३,७२०, नाशिक ४८२, पुणे १०,३१७, औरंगाबाद १,५६९, अमरावती १,०२२ तर नागपूर विभागातील २३ उमेदवार आहेत. याशिवाय सोसायटीने त्यांच्या उपक्रमातून ५८२ उमेदवारांना रोजगार मिळवून दिला.आॅनलाइन मुलाखतींना प्राधान्यकौशल्य विकास विभागाने तीन महिन्यांत राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय आॅनलाइन रोजगार मेळाव्यांची मोहीम सुरू केली आहे. जिल्हास्तरावर २४ आॅनलाइन रोजगार मेळावे झाले असून त्यात १६७ उद्योजक सहभागी झाले होते. त्यांच्याकडील १६,११७ जागांसाठी आॅनलाइन मुलाखती झाल्या. या मेळाव्यांमध्ये ४०,२२९ तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत २,१४० तरुणांना रोजगार मिळाला.

टॅग्स :jobनोकरी