शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक वर्ष संपायला उरले १७ दिवस, खर्च केवळ ४७ टक्के; अर्थसंकल्पाला मोठा कट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 11:32 IST

३१ मार्चला रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात लगबग असते. अनेक आमदार आपापल्या मतदारसंघात मंजूर निधी पदरी पाडून घेण्यासाठी धडपड करतात.

मुंबई : आर्थिक वर्ष २०२५-२६ संपायला केवळ १७ दिवस उरले असताना आतापर्यंत राज्य सरकारच्या विविध विभागांचा अर्थसंकल्पीय तरतुदीच्या तुलनेत केवळ ४७ टक्के इतकाच सरासरी निधी खर्च झाला आहे. या पार्श्वभूमीवर तसेच राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता अर्थसंकल्पाला मोठा कट लागण्याची शक्यता आहे. 

३१ मार्चला रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात लगबग असते. अनेक आमदार आपापल्या मतदारसंघात मंजूर निधी पदरी पाडून घेण्यासाठी धडपड करतात. तसेच चित्र याही वर्षी मंत्रालयात दिसणार आहे.  लाडकी बहीण योजनेवर झालेला मोठा खर्च, राज्याच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ न होणे याचा फटका अर्थसंकल्पीय तरतूद प्रत्यक्षात वितरित होण्यावर नक्कीच दिसणार आहे. या तरतुदीत यंदा १५ ते २५ टक्के इतका कट लावला जाण्याची शक्यता आहे.

सुट्टीच्या दिवशीही कोषागारे सुरू राहणार ३१ मार्चप्रमाणेच त्या आधी २८ आणि २९ मार्चला शनिवार, रविवारी सुट्टी असली तरी त्याही दिवशी अनुदान व लेखा कार्यालये, जिल्हा कोषागारे व उपकोषागारे देयके स्वीकारण्यासाठी सुरू राहणार आहेत. वित्त विभागाने एक परिपत्रक काढून प्रवासभत्ता देयके, आस्थापनाविषयक पुरवणी देयके, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीची देयके २५ मार्चनंतर स्वीकारली जाणार नाहीत, असे  प्रशासनाले स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.  

महसुली उत्पन्नात यंदा अपेक्षित वाढ नाही राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली असली तरी आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत निधी खर्चाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात कमी राहिले आहे. साधारणपणे जानेवारीनंतर खर्चाचा वेग वाढतो; मात्र यंदा महसुली उत्पन्नातील अपेक्षित वाढ न झाल्याने आणि काही मोठ्या योजनांवरील खर्चामुळे इतर विभागांच्या निधी वितरणावर मर्यादा आल्याचे वित्त विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra faces budget cuts as spending lags with days remaining.

Web Summary : Maharashtra's departments have spent only 47% of allotted funds with 17 days left. Expected revenue shortfall and spending on flagship schemes might lead to budget cuts of 15-25%. Treasury offices will remain open during holidays to process payments.
टॅग्स :Governmentसरकार