प्रशासकांनी विकले 17 सहकारी कारखाने
By Admin | Updated: September 4, 2014 02:07 IST2014-09-04T02:07:57+5:302014-09-04T02:07:57+5:30
प्रशासक मंडळाच्या कार्यकाळात राज्य सहकारी बँकेच्या ठेवी 4972 कोटींनी कमी तर 16 जिल्हा बँकांच्या ठेवी कर्जापेक्षा कमी झाल्या आहेत.

प्रशासकांनी विकले 17 सहकारी कारखाने
अतुल कुलकर्णी मुंबई
प्रशासक मंडळाच्या कार्यकाळात राज्य सहकारी बँकेच्या ठेवी 4972 कोटींनी कमी तर 16 जिल्हा बँकांच्या ठेवी कर्जापेक्षा कमी झाल्या आहेत.
31 पैकी सहा ते सात जिल्हा
बँका वगळता सगळ्यांना ऑडिटचा
ब, क दर्जा मिळाला आहे, तर
दुसरीकडे अन्य व्यावसायिक बँकांप्रमाणो वसुलीचा सोपा
मार्ग स्वीकारत राज्य बँकेने
त्यांच्या कार्यकाळात 15 सहकारी साखर कारखाने आणि दोन जिनिंग प्रेसिंग मिल खासगीकरणात विकून टाकल्या.
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी ठेवी कमी
झाल्याचे मान्य केले पण त्याची
कारणो वेगवेगळी असल्याचा
दावा केला. जुन्या ठेवी जास्त व्याजदराच्या होत्या. तेवढे व्याज देखील त्यातून मिळत नव्हते, असे कर्नाड यांनी सांगितले. राज्य सहकारी बँकेसाठी बँकींग हे अनुषंगिक होते. ग्रामीण कजर्पुरवठय़ाची, शेतीसाठीच्या कर्जाची सोय करणो
हे या बँकेचे मुख्य काम
असताना चुकीच्या पध्दतीने बँक वर्षानुवर्षे चालवली गेली आणि
आता आपल्याच नाकातोंडात
पाणी जाऊ लागल्यानंतर राज्य बँकेने बडतर्फ संचालकांनी घालून दिलेल्याच पायवाटेने जात 17 सहकारी कारखाने खासगीकरणात विकून टाकले आहेत.
स्वत:ची राजकीय, सामाजिक ताकद वापरून जिल्हा व राज्य बँकेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर व्यवहार केले गेले, त्यातून या बँका डबघाईला येताच त्या वाचविण्याचा आव आणत आपल्याच जवळच्या नेत्यांना, त्यांच्या खासगी कंपन्यांना सहकारी कारखाने विकून टाकण्यात आले.
आमच्या बँकेला ऑडिटचा ए दर्जा मिळाला, आम्ही आता लाभांश वाटत आहोत, असे राज्य बँक सांगत असली तरी हा व्यवहार सहकार चळवळीच्या मुळावर घाव घालणारा आहे.
(उद्याच्या अंकात : कोणता कारखाना कोणाला आणि कितीला विकला?)
(संचालक मंडळाच्या काळात ठेवी जास्त दिसत असल्या तरी त्या जास्तीचे व्याज देऊन आणल्या गेल्या होत्या. व्याजाएवढेही उत्पन्न त्यातून मिळत नव्हते, असे प्रमोद कर्नाड यांचे म्हणणो आहे.)