CoronaVirus News: चिंताजनक स्थिती! राज्यात कोरोनाचे 16,408 नवे रुग्ण; 296 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 09:29 PM2020-08-30T21:29:52+5:302020-08-30T21:30:29+5:30

शनिवारीदेखील राज्यात १६,८६७ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तसेच ३२८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली होती.

16,408 new patients of coronavirus in the state; 296 people died | CoronaVirus News: चिंताजनक स्थिती! राज्यात कोरोनाचे 16,408 नवे रुग्ण; 296 जणांचा मृत्यू

CoronaVirus News: चिंताजनक स्थिती! राज्यात कोरोनाचे 16,408 नवे रुग्ण; 296 जणांचा मृत्यू

Next

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे आज दिवसभरात 16,408 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 296 जणांचा मृत्यू झाला आहे. 


राज्यातील उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी 7,690 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 1,93,548 रुग्ण उपचार घेत आहेत. एकट्या पुण्यातच 51,909 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील एका जिल्ह्यातील हा सर्वाधिक आकडा आहे. राज्यात आतापर्यंत 5,62,401 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंच 24,399 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. 



 

शनिवारीदेखील राज्यात १६,८६७ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तसेच ३२८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली होती. राज्यातील कोरोना रुग्णांचा हा आकडा चिंता वाढवणारा आहे.

Web Title: 16,408 new patients of coronavirus in the state; 296 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.