शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अडकलेले कांद्याचे १६२ कंटेनर परदेशात रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 07:42 IST

निर्यातदारांनी घेतला सुटकेचा नि:श्वास : निर्यातबंदीनंतर जेएनपीटी बंदरात अडकून पडला होता माल

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठविण्यात आल्यानंतर मागील सहा दिवसांपासून जेएनपीटी बंदरात अडकून पडलेले निर्यातीसाठी आलेले कांद्याचे १६२ कंटेनर रविवारी बंदरातून रवाना झाले असल्याची माहिती जेएनपीटीकडून देण्यात आली.

केंद्र सरकारने सहा दिवसांपूर्वी तडकाफडकी कांदा निर्यातबंदी लादली होती. या निर्यातबंदीमुळे मात्र, जेएनपीटी बंदरातून युरोप आणि मिडल इस्ट येथे निर्यातीसाठी आलेले कांद्याचे १६२ कंटेनर बंदरात अडकून पडले होते. जेएनपीसीटी बंदरासह अंतर्गत असलेल्या अन्य तीन खासगी बंदरात एकूण ३,८८८ मॅट्रिक टन कांदा अडकून पडल्याने निर्यातदार विवंचनेत सापडले होते. त्यातच अडकून पडलेल्या कांद्याच्या प्रत्येक रिफर कंटेनरसाठी निर्यातदारांना प्रति दिन पंधराशे रुपये अतिरिक्त भाडे मोजावे लागत होते. मोजाव्या लागणाऱ्या या अतिरिक्त ज्यादा खर्चामुळे मात्र, निर्यातदारही पुरते हैराण झाले होते. पण कांदा परदेशात रवाना झाल्याने निर्यातदारांना दिलासा मिळाला आहे.

निर्यातबंदी उठविल्याने मिळाला दिलासानिर्यातबंदी उठवण्यासाठी देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन पेटले होते. केंद्र सरकारच्या विरोधात निषेधही करण्यात आला होता. अखेर आंदोलनाची दखल घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंदरात निर्यातीसाठी बंदरात अडकलेले १६२ कांद्याचे कंटेनर बंदरातून रवाना झाल्याची माहिती जेएनपीटी नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

टॅग्स :onionकांदा