शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१६ आमदार निलंबित होणारच; अरविंद सावंत; आता राजकीय नव्हे तर कायदेशीर लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 09:08 IST

शिवसेना भवन येथे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील वकील देवदत्त कामत यांच्याकरवी कायदेशीर बाजू मांडली.

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार जुन्या तरतुदींच्या आधारे आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शिवसेनेच्या नावाने वेगळा गट काढता येणार नाही. अन्य पक्षात विलीनीकरणाशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच उरलेला नाही. सभागृहाबाहेरील कृतीसुद्धा पक्षविरोधी कारवाई ठरते आणि त्यानुसार निलंबनाची कारवाई करता येते, असे विविध दावे करत १६ बंडखोरांवर निलंबनाची कारवाई होणारच, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनाच माध्यमांसमोर आणत आता हा लढा केवळ राजकीय न राहता कायदेशीर बनल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रविवारी स्पष्ट केले. शिवसेना भवन येथे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील वकील देवदत्त कामत यांच्याकरवी कायदेशीर बाजू मांडली. गुवाहाटी येथे थांबलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. या आमदारांवरील कारवाईसाठी आमच्याकडून कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कामत यांनी एकनाथ शिंदे गटाकडून केले जाणारे दावे चुकीचे असल्याचा दावा केला. सभागृहाबाहेरही पक्षाचा व्हीप लागू होतो. सभागृहाबाहेरील कृतीसुद्धा पक्षविरोधी ठरली तर सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. सध्याच्या प्रकरणात महत्त्वाच्या प्रसंगी शिवसेनेकडून अनेक बैठका बोलावण्यात आल्या होत्या. मात्र, या बैठकांना बंडखोर आमदार हजर राहिले नाहीत. शिवाय, दुसऱ्या राज्यात जाणे, भाजपच्या नेत्यांशी चर्चा करणे, सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणे हे यासंदर्भातल्या कायद्याचे उल्लंघन असल्याचे कामत यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्षांना पूर्ण अधिकार आहेत. उपाध्यक्षांच्या विरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळला गेला आहे. तसेच, अधिवेशन सुरू झाल्याशिवाय अविश्वास प्रस्ताव मांडला जाऊ शकत नाही, असेही कामत  म्हणाले.

अपात्रतेपासून वाचू शकत नाहीदोनतृतीयांश सदस्यांचा वेगळा गट अन्य पक्षात विलीन झाला तरच अपात्रतेची कारवाई होत नाही. आतापर्यंत कोणत्याही प्रकारे विलीनीकरण झालेले नाही. २००३ पूर्वी आमदारांना वेगळे होण्यासंदर्भात दोनतृतीयांश सदस्यसंख्येचा नियम होता. पण त्यानंतर विलीनीकरणाची अट त्यात समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे विलीनीकरण झाल्याशिवाय ते अपात्रतेपासून वाचू शकत नाही, असे कामत यांनी सांगितले. 

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे