शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट? 16 आमदारांनी द्रौपदी मुर्मूंना दिलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 22:56 IST

Presidential Election 2022 : देशभरात १०४ आमदारांची क्रॉस व्होटिंग केले असून त्यातील १६ राज्यातील असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते.

मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. त्यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. दरम्यान राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या १६ आमदारांनी द्रौपदी मुर्मूच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रातच नव्हती तर देशभरातून क्रॉस व्होटिंग झाल्याचे समोर आले आहे. 

देशभरात १०४ आमदारांची क्रॉस व्होटिंग केले असून त्यातील १६ राज्यातील असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते. भाजपने द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी मोठी तयारी केली होती. त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, या निवडणूकीत मोठ्य प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तब्बल १७ खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूच्या बाजूने क्रॉस व्होट केले आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मते तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मते मिळाली आहेत. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच द्रौपदी मुर्मू यांनी आघाडी घेतली होती ती अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यापर्यंत कायम राखली. पहिल्या टप्प्यात द्रौपदी मुर्मू यांना ५४० मते मिळाली होती. या मताचे मूल्य ३,७८,००० इतके होते. तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ मते मिळाली होती. त्यांच्या मतांचे मूल्य १,४५,००० इतके होते. दुसऱ्या फेरीत मुर्मू यांना १३४९ मते मिळाली तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मते मिळाली. 

एकनाथ शिंदे यांचा २०० मतांचा दावा ठरला योग्य या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी शिंदे गट आणि भाजपा आमदारांच्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये झालेल्या एकत्रित बैठकीत द्रौपदी मुर्मू यांना राज्यातून २०० मते मिळतील, असा अंदाज एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता. त्यात भाजपा १०६ , शिंदे गट ५० असे मिळून १७० जण होते. तसेच उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिल्याने शिवसेना आमदारांची १६ मतेही राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मूर्मुंना मिळाली होती. हा सगळा आकडा १८५ च्या आसपास जातो. २०० चा आकडा शिंदे यांनी सांगितला होता. त्यामुळे त्यांच्या अपक्षेप्रमाणे १६ मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते आशिष शेलार यांनीही हे संकेत आधी दिले होते, मात्र त्यांनी आकडा सांगितला नव्हता.  

टॅग्स :President Election 2022राष्ट्रपती निवडणूक 2022NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूYashwant Sinhaयशवंत सिन्हा