शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

विभागातील १६ मध्यम प्रकल्पांची स्थिती चांगली! पाण्याची समस्या सुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 18:19 IST

पश्चिम विदर्भातील २३ मध्यम प्रकल्पांपैकी १६ मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा सद्यस्थितीत असल्याने पुढील वर्षाची सिंचनासह पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे.

अमरावती : पश्चिम विदर्भातील २३ मध्यम प्रकल्पांपैकी १६ मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा सद्यस्थितीत असल्याने पुढील वर्षाची सिंचनासह पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. मात्र, उर्वरित सात मध्यम प्रकल्पांमध्ये ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा नाही. बुलडाणा जिल्ह्यात हे प्रकल्प आहेत. यामुळे येथे उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.पश्चिम विदर्भातील एकूण २४ प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ६७६.७४ दलघमी एवढा आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाढा हा ४५६.०९ दलघमी आहे. २४ प्रकल्पांमध्ये सरासरी ६७.४० टक्के पाणीसाठा असला तरी यवतमाळ, अकोला व वाशिम जिल्ह्यांची स्थिती खूपच चांगली आहे. त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क््यांंपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्याला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आॅक्टोबरमध्ये या जिल्ह्यातील सिंचनाला पाणी किती द्यायचे किंवा नाही तसेच पिण्यासाठी किती साठा राखीव ठेवायचा, यासंदर्भाचे धोरण ठरणार असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. 

अशी आहे, प्रकल्पनिहाय पाणीसाठ्याची स्थिती...अमरावती जिल्ह्यातील शहानूर प्रकल्पात ६४.०५ टक्के, चंद्रभागा ७१.१८ टक्के, पूर्णा ५०.१० टक्के,  सपन ८७.२३ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस ९०.०२ टक्के,  सायखेडा १०० टक्के,  गोकी ८८.०८ टक्के,  वाघाडी ८२.०४ टक्के,  बोरगाव १०० टक्के, नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा १०० टक्के, मोर्णा ४९.७१ टक्के,  उमा १०० टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण ९१.६९ टक्के, सोनल १००टक्के, एकबर्जी १०० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा १९.९८ टक्के,  पलढग २५.५७ टक्के, मस ४.१२ टक्के,  कोराडी  ६.२८ टक्के, मन २४.६८टक्के, तोरणा १४.३२ टक्के आणि उतावळी प्रकल्पात ३५.८३ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :DamधरणAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र