कार्तिकी एकादशीसाठी एसटीच्या १६ जादा गाड्या

By Admin | Updated: October 23, 2015 02:02 IST2015-10-23T02:02:23+5:302015-10-23T02:02:23+5:30

येत्या २२ नोव्हेंबर रोजी असलेल्या कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून १६ जागा गाड्या सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील विविध

16 additional trains of ST for Kartiki Ekadashi | कार्तिकी एकादशीसाठी एसटीच्या १६ जादा गाड्या

कार्तिकी एकादशीसाठी एसटीच्या १६ जादा गाड्या

ठाणे : येत्या २२ नोव्हेंबर रोजी असलेल्या कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून १६ जागा गाड्या सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील विविध बसस्थानकांमधून १९ नोव्हेंबरपासून १६ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ठाणे बस स्थानक, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, बोरीवली-नॅन्सी कॉलनी तसेच मुरबाड येथून या जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आठ आगारांमधून प्रत्येकी दोन अशा १६ गाड्यांचे नियोजन असले, तरी प्रवासी संख्या वाढल्यास त्या वाढविण्यात येणार आहेत. त्यांच्या आरक्षणासाठी भाविकांनी संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचे आवाहन विभाग नियंत्रक अविनाश पाटील यांनी केले आहे.

Web Title: 16 additional trains of ST for Kartiki Ekadashi