शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बनावट शालार्थ आयडीद्वारे हडपले वेतनाचे सव्वाकोटी; २० जणांवर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 06:47 IST

मुंबई शिक्षण बोर्डाच्या वाशीतील कार्यालयात नोंद असलेल्या शिक्षकांच्याही नोंदी तपासल्या जात होत्या. त्यामध्ये काही शिक्षण संस्था, शिक्षक यांच्यामार्फत बनावट शालार्थ आयडी जमा करून शासनामार्फत वेतन घेतले जात असल्याचे दिसून आले

नवी मुंबई - मुंबईच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षासह २० जणांवर सव्वाकोटींच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात डोंबिवली, अलिबाग, खोपोली येथील शिक्षण संस्थांचे पदाधिकारी व शिक्षकांचा समावेश आहे. मंडळ अध्यक्षांच्या संमतीने त्यांनी बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनामार्फत वेतनाचे सव्वाकोटी लाटल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.

मुंबई शिक्षण बोर्डाच्या वाशीतील कार्यालयात नोंद असलेल्या शिक्षकांच्याही नोंदी तपासल्या जात होत्या. त्यामध्ये काही शिक्षण संस्था, शिक्षक यांच्यामार्फत बनावट शालार्थ आयडी जमा करून शासनामार्फत वेतन घेतले जात असल्याचे दिसून आले. तर शिक्षण मंडळाच्या कार्यालयात त्यांच्या नोंदीमध्ये शालार्थ आयडी नंबरची जागा रिकामी ठेवली होती. यावरून शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष नितीन उपासनी यांच्या संमतीने हा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबई विभागाच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याद्वारे शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष नितीन उपासनी यांच्यासह विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी व शिक्षक अशा २० जणांवर गुन्हा नोंदवला.

राज्यात इतरही भागात असे प्रकार घडल्याची शक्यताकाही महिन्यांपूर्वी राज्याच्या इतरही काही भागांमध्ये अशाच प्रकारे बनावट शालार्थ आयडी तयार करून शिक्षक व शिक्षण संस्थांनी शासनाचे वेतन अनुदान लाटल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. मुंबई बोर्डातही हा प्रकार उघड झाल्याने व त्यात थेट तत्कालीन अध्यक्षच संशयाच्या घेऱ्यात आल्याने राज्याच्या इतरही भागात असे प्रकार घडले असल्याची शक्यता आहे.

...यांच्यावर गुन्हा दाखल मुंबई शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष नितीन उपासनी,  मिलिंद पाटील, तत्कालीन प्राचार्य अनिल पाटील, विद्यमान प्राचार्या सोनाली पाटील, सहशिक्षिका मयुरी पाटील, ज्येष्ठ पाटील, स्वप्नील राऊत, वैभव गोसावी. केएमसी संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य एन. बी. पवार यांच्यासह एन. रामास्वामी, डी. पी. हरिदास, एन. बी. खानविलकर, पी. जी. पाटील, विद्यमान प्राचार्य डी. पी. गायकवाड आदिंवर गुन्हा नोंदवला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake ID Scam: Crores Embezzled, 20 Booked for Fraud

Web Summary : Ex-Mumbai Education Board head and 19 others booked for embezzling crores using fake IDs. Officials from Dombivali, Alibag, and Khopoli education institutions are implicated. The scam involved creating bogus IDs to siphon government funds.