शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत 148 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 'या' रुग्णालयातील तब्बल 80 जण संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 18:04 IST

बॉम्बे रुग्णालयात 2 नवे रुग्ण आढळले आहेत आणि हे दोघेही येथील डॉक्टर आहेत. यामुळे या रुग्णालयातील कोरोनाबाधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या 12वर पोहोचली आहे. जसलोक रुग्णालयात 21 नवे रुग्ण समोर आले आहेत. यासर्व रुग्णालयातील नर्स आहेत.

ठळक मुद्देअनेक रुग्णालयांमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागणवॉकहार्ट रुग्णालयात 26 नवे कोरोना पॉझिटिव्ह समोर आले आहेतराज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 हजार 690 वर

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे जवळपास 148 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समजते. तर अद्याप तपासणीनंतर अनेकांचा अहवाल येणे बाकी आहे. वॉकहार्ट रुग्णालयात 26 नवे कोरोना पॉझिटिव्ह समोर आले आहेत आणि हे सर्व येथील वैद्यकीय कर्मचारी आहेत. आतापर्यंत या रुग्णालयातील जवळपास 80 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

अनेक रुग्णालयांत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण -बॉम्बे रुग्णालयात 2 नवे रुग्ण आढळले आहेत आणि हे दोघेही येथील डॉक्टर आहेत. यामुळे या रुग्णालयातील कोरोनाबाधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या 12वर पोहोचली आहे. जसलोक रुग्णालयात 21 नवे रुग्ण समोर आले आहेत. यासर्व रुग्णालयातील नर्स आहेत. तर भाटिया रुग्णालयात एकूण 35 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

वॉकहार्ट रुग्णालयातील आकडा वाढतोय -गेल्या 6 एप्रिलला वॉकहार्ट रुग्णालयातील 150हून अधिक कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येथे एक 70 वर्षी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आला होता. या रुग्णाची देखभाल करणाऱ्या दोन नर्सना सर्वप्रथम कोरोनाचा लागण झाली आणि कोरोनाने हाळू-हळू अनेकांना आपल्या विळख्यात घेतले. यानंतर बीएमसीने हे रुग्णालय सील करण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतेय -राज्यात शनिवारी तब्बल 328 कोरोना रुग्णांचे निदान झाले, यातील एकट्या मुंबईत 284 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 हजार 690 वर पोहोचली आहे. तर मुंबईत एकूण 2 हजार 268 कोरोना रुग्ण झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 216 झाली आहे, तर मुंबईत ही संख्या 126 इतकी आहे.

देशात आतापर्यंत 15,712हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून 500हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 24 तासांत 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 1334 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईRajesh Topeराजेश टोपेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरUddhav Thackerayउद्धव ठाकरे