१४ वर्षे फरार गुन्हेगार गजाआड

By Admin | Updated: April 7, 2017 02:03 IST2017-04-07T02:03:02+5:302017-04-07T02:03:02+5:30

गेल्या १४ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर टोळीतील सराईत आरोपीला गुन्हे शाखेने गुरुवारी बेड्या ठोकल्या

14 years absconding criminals go to jail | १४ वर्षे फरार गुन्हेगार गजाआड

१४ वर्षे फरार गुन्हेगार गजाआड

मुंबई : गेल्या १४ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर टोळीतील सराईत आरोपीला गुन्हे शाखेने गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत. जॉन अ‍ॅग्नोलो असे त्याचे नाव असून त्याच्याकडून ८ सिमकार्ड जप्त करण्यात आली. त्याने
बनावट कागदपत्रांच्या आधारे ही सिमकार्ड घेतल्याचे तपासात समोर आले.
मूळचा खार येथील रहिवासी असलेल्या जॉनने १९८६ मध्ये त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या साथीदारासह एका व्यक्तीची अ‍ॅसिड टाकून हत्या केली. त्याचा मोठा भाऊ काल्या अ‍ॅन्थोनी आणि ठाकूर एकत्र काम करत होते.
त्याच्याविरुद्ध मुंबईसह दिल्ली पोलिसांनी टाडाअंतर्गत कारवाई केली होती. व्यापाऱ्याकडून खंडणी उकळणे तसेच नालासोपारा येथे २००३ मध्ये झालेल्या हत्या प्रकरणातही तो वॉण्टेड आरोपी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 14 years absconding criminals go to jail