पंढरपूर- सोलापूर रस्त्यावर अपघातात १४ जखमी
By Admin | Updated: April 23, 2016 16:39 IST2016-04-23T16:39:20+5:302016-04-23T16:39:20+5:30
अपघातात दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झाले आहेत, तर एसटीतील १२ प्रवासी किरकोळ जखमी आहेत

पंढरपूर- सोलापूर रस्त्यावर अपघातात १४ जखमी
>ऑनलाइन लोकमत -
पंढरपूर, दि. २३ - पंढरपूर - सोलापूर रस्त्यावर एसटी बस आणि आयशर टॅम्पो चा समोरसमोर अपघात झाला आहे. अपघातात दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झाले आहेत, तर एसटीतील १२ प्रवासी किरकोळ जखमी आहेत. सकाळी अकराच्या सुमारास पेनूर (ता. मोहोळ) जवळील माळीपाटी गावाजवळ हा अपघात झाला.
सकाळी याच रस्त्यावर कार व टेंपोच्या अपघातात दोन ठार तर तीन जखमी झाले होते. योगेश पवार (वय ३८, दहीवडी, ता सातारा ) असे एसटी चालकाचे नाव आहे, तर बंडू बजरंग आवताडे (वय ५०, रा. एकलासपूर, मोहोळ) असे टेंपो चालकाचे नाव आहे. दोघांनाही उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
लातूर- सातारा ही एसटी बस ( एम एच १४ बीटी ३६९६) दुपारी अकराच्या सुमारास मोहोळ स्थानक पास करुन पंढरपूरकडे रवाना झाली होती. पेनूर जवळ एका ट्रकला ओव्हरटेक करताना समोरुन येणा-या आयशर टेप्मोला (एम एच १३, आर २१८६) धडक बसली. एसटीत ४२ प्रवासी होते त्यातील १२ जण किरकोळ जखमी झाले. तर टेप्मो मधे पंढरपूरच्या विठठल सहकारी साखर कारखान्याची साखरेची पोती होती. मोहोळ पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.