‘बाभळी’चे १४ दरवाजे उघडले

By Admin | Updated: July 2, 2016 04:31 IST2016-07-02T04:31:38+5:302016-07-02T04:31:38+5:30

तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शुक्रवारी त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत उघडण्यात आले़

14 doors of 'bhabhi' opened | ‘बाभळी’चे १४ दरवाजे उघडले

‘बाभळी’चे १४ दरवाजे उघडले


धर्माबाद (जि. नांदेड) : तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शुक्रवारी त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत उघडण्यात आले़ दुष्काळ परिस्थिीत संघर्षाने इसापूर धरणाचे सोडलेले पाणी व पावसाने जमा झालेले ०़३ टीएमसी पाणी तेलंगणाकडे प्रवाहित झाले़
त्रिस्तरीय समितीत केंद्राचे अभियंता श्रीनिवासराव, तेलंगणाचे अभियंता रामाराव व नांदेड बंधारा विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता एम़ टी़ लव्हराळे आदींच्या उपस्थितीत सकाळी साडेअकराला पहिले गेट उघडण्यात आले़ त्यानंतर दर-पंधरा मिनिटाच्या अंतराने एक याप्रमाणे सर्व १४ गेट उघडण्यात आले़
बाभळी बंधारा तेलंगणा व महाराष्ट्र या दोन राज्यात संघर्ष होवून न्यायालयात गेला होता़ त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे २८ आॅक्टोबरनंतर बंद करावेत व १ जुलै रोजी उघडण्यात यावेत़ तसेच १ मार्च रोजी ०़६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडावे असा निर्णय दिला होता़ या निर्णयानुसार १ जुलै रोजी बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडले़
शेजारील राज्यालाही पाणी मिळावे परंतु पाणी सोडण्याच्या तारखेत बदल करण्यात यावे, या मागणीसाठी बाभळी बंधारा कृती समिती सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करणार असल्याचे कृती समितीचे डॉ़ बालाजी कोंपलवार यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: 14 doors of 'bhabhi' opened