शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

पाण्याअभावी १४ टक्के पीक घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 07:07 IST

अवघ्या ३२ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकाची पेरणी

पुणे : राज्यात दुष्काळ पडल्याने अनेक शेतकऱ्यांना रब्बी पिकांची पेरणीच करता आली नाही. शेतीसाठी पाणीच नसल्याने उन्हाळी पीक पेरणीही करपली आहेत. राज्यातील उन्हाळी पिकाच्या सरासरी क्षेत्राच्या अवघ्या ३२ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली असून गेल्या वर्षापेक्षा यंदा उन्हाळी पिकांचे १४ टक्के घटले आहे.पावसाने यंदा महाराष्ट्रावर चांगलीच अवकृपा दाखवली. राज्यातील काही भागातील खरिपाच्या पिकांना आणि त्यानंतर बहुतांश भागात रब्बी पिकांना वेळेवर पाऊस पडला नाही. त्यामुळे राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात रब्बी पिकांच्या पेरण्याच होऊ शकल्या नाही. त्यात कृषी विभागाच्या अहवालानुसार राज्यात यंदा उन्हाळी पिकांच्या पेरणीत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात उन्हाळी पिकाचे सरासरी १.६८ लाख हेक्टर क्षेत्र असून आत्तापर्यंत केवळ ०.५२ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात औरंगाबाद विभाग वगळता इतर विभागात उन्हाळी पिकांची पेरणी सुरू आहे.नागपूर विभागात उन्हाळी पिकांची सर्वाधिक ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोकण विभागात ४३ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली असून भात पिकाची लावणी व भुईमूग पिकाच्या पेरणीची कामे सुरू आहेत. नाशिक विभागात २२ क्षेत्रांवर पेरणी झाली असून पुणे विभागात केवळ ११ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर कोल्हापूर विभागात २१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून उन्हाळी भुईमूग फांद्या फुटण्याच्या अवस्थेत तर मका पीक उगवणे ते वाढीच्या अवस्थेत आहे. लातूर विभागात केवळ ९ टक्के क्षेत्रावर तर अमरावती विभागात २४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.राज्यात उन्हाळी मका व भूईमुग पीक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. राज्यात उन्हाळी मका पिकाचे सरासरी क्षेत्र २४ हजार ६९९ असून आत्तापर्यंत ७ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी झाली आहे. तर भूईमुगाच्या ८२ हजार २४४ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ९ हजार ६३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.विशेष काळजी...कृषी विभागाने भूईमुग, मका आणि आंबा पिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कृषी सल्ला केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. भूईमुगावरील पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी आळी यावर नियंत्रण आणण्यासाठी औषधे सुचवली आहेत. तर उन्हाळ्यात भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याबाबत काळजी घ्यावी, असेही आवाहन केले आहे.