वर्षभरात १३ हजार रुग्णांनी घेतला लाभ

By Admin | Updated: November 25, 2014 00:51 IST2014-11-25T00:51:42+5:302014-11-25T00:51:42+5:30

गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या १३ हजारावर गोरगरीब रु ग्णांना शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार मिळाला आहे.

13 thousand patients benefited from the year | वर्षभरात १३ हजार रुग्णांनी घेतला लाभ

वर्षभरात १३ हजार रुग्णांनी घेतला लाभ

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला झाले वर्ष
सुमेध वाघमारे - नागपूर
गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या १३ हजारावर गोरगरीब रु ग्णांना शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार मिळाला आहे. दोन वर्षे पूर्ण झालेल्या योजनेला शासनाने पुढील एक वर्षासाठी नूतनीकरण करून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गोरगरीब रु ग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या या योजनेचा सर्वात जास्त लाभ मागील वर्षी कर्करोग, हृदयरोग व मूत्रपिंडाशी संबंधित रुग्णांंनी घेतला आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना २ जुलै २०१२ पासून सुरू झाली. या योजनेचा दुसरा टप्पा २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात सुरू झाला. नागपूर जिल्ह्यात ही योजना तीन शासकीय रुग्णालयांसोबतच निवडक ३६ खासगी इस्पितळांमध्ये सुरू आहे. या योजनेच्या विमा कंपनीशी असलेली पॉलिसी एक वर्षाची असल्यामुळे त्याची मुदत २१ नोव्हेंबर रोजी संपली आहे. शासनाने या विमा पॉलिसीचे नूतनीकरण केले असून यामुळे योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना १.५० लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचे संरक्षण चालू राहणार आहे.
दहा खासगी इस्पितळांची कामगिरी उत्कृष्ट
ही योजना तीन शासकीय रुग्णालयांसह ३६ खासगी रुग्णालयांत सुरू आहे. मागील वर्षी दहा खासगी इस्पितळांची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. यात आशा हॉस्पिटलमध्ये २८२, अश्विनी किडनी अ‍ॅण्ड डायलेसीस सेंटरमध्ये ४९४, बारस्कर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये २०८, सेंट्रल इंडिया कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ३१५, क्रेसेन्ट हॉस्पिटल अ‍ॅण्ड हार्ट सेंटरमध्ये ४७९, गंगा केअर हॉस्पिटलमध्ये २५५, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ३९६, मोगरे चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये १९४, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये २ हजार ७७८ तर श्रावण हॉस्पिटल अ‍ॅण्ड किडनी इन्स्टिट्यूटमध्ये ६२५ रुग्णांनी उपचार घेतला.
३१ कोटी ६८ लाखांचा खर्च
मागील वर्षी या योजनेत १३ हजार ३ रु ग्णांनी या योजनेचा लाभ घेतला. या रु ग्णांवरील मोफत उपचारापोटी राज्य शासनाने ३० कोटी ७४ लाख ३० हजार ७६२ रु पयांचा खर्च संबंधित उपचार करणाऱ्या रु ग्णालयांना देण्यात आला आहे.
कर्करोगाच्या ४ हजार ७५८ रुग्णांवर उपचार
या योजनेत सर्वात जास्त कर्करोगाच्या ४ हजार ७५८ रुग्णांनी उपचार करून घेतला. मूत्रपिंड आजाराच्या १ हजार ३१५ रुग्णांनी तर हृदयाच्या १ हजार १४७ रुग्णांनी उपचार करून घेतले. ९४१ रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. १ हजार ३७३ रुग्णांनी रेडिएशन घेतले आहे. असा एकूण १३ हजाराच्यावर रुग्णांना लाभ घेतला आहे.
मेडिकलमध्ये सर्वात जास्त रुग्णांवर उपचार
या योजनेत मेडिकलमध्ये सर्वात जास्त ३ हजार ६१५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात १ हजार २४४ रुग्णांवर तर मेयोमध्ये ६१० रुग्णांवर उपचार करण्यात आले. वर्षभरात या तिन्ही शासकीय रुग्णालयांमध्ये ५ हजार ४६९ रुग्णांवर उपचार झाले.
खासगी इस्पितळांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ५८ टक्के रुग्णांनी खासगी इस्पितळात तर ४२ टक्के रुग्णांनी शासकीय रुग्णालयात उपचार करून घेतले. दिवसेंदिवस खासगी इस्पितळांमध्ये या योजनेतील रुग्णांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे.
शहरातील साडेचार हजार रुग्णांवर उपचार
नागपूर जिल्ह्यतील १४ तालुक्यामधून सर्वात जास्त नागपूर शहरातील ४ हजार ५०५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर कामठीमधून ४१०, काटोलमधून २७०, सावनेरमधून २५५ तर नागपूर ग्रामीणमधून २०० रुग्णांनी याचा लाभ
सेवेत नागपूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील सर्वात जास्त १३ हजार तीन रुग्णांनी घेतला. भंडारा जिल्ह्यात ७३३, चंद्रपूर २७७, गडचिरोली २६०, गोंदिया ५१४ तर वर्धा जिल्ह्यात ५ हजार ८०६ रुग्णांनी लाभ घेतला. याचे श्रेय या योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. एम.एस. पिंपळगावकर व डॉ. धीरज वासेकर यांना जाते. यांच्या परिश्रमामुळे ही योजना जिल्ह्यात सुरळीत सुरू असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: 13 thousand patients benefited from the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.