शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

राज्यात ३० हजार रस्ते अपघातांत १३ हजार मृत्यू; परिवहनमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 7:10 AM

राज्यात गेल्या वर्षी सुमारे ३० हजार रस्ते अपघात झाले असून त्यात १३ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

मुंबई  - राज्यात गेल्या वर्षी सुमारे ३० हजार रस्ते अपघात झाले असून त्यात १३ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. एकूण अपघातांमध्ये सुमारे ११ हजार मृत्यू म्हणजे ८० टक्के मृत्यू हे मानवी चुकांमुळे झाल्याचेही त्यांनी सांगितले. अपघातांबाबत जनजागृती करण्यासाठीच परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस शाखेमार्फत राज्यभरात ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा सप्ताहा’चे आयोजन केले असून त्याच्या शुभारंभाप्रसंगी रावते बोलत होते.नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोमवारी आयोजित कार्यक्रमात रावते यांनी सांगितले की, राज्यात वाहनांची संख्या ३ कोटी २९ लाख इतकी झाली असून त्यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या अधिक आहे. अपघातांची आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. वाहनांच्या वेगाबरोबर अपघातांची आणि त्यातील मृत्यूंची संख्या वाढत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे हा अति वेगामुळे मृत्यूचा सापळा झाला आहे.अपघात रोखण्यासाठी सर्वांनी रस्ते सुरक्षेबाबत जाणीव ठेवून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक व कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे. पण शासनाने हेल्मेटची सक्ती केली, असे म्हणत या चांगल्या मोहिमेबाबत अपप्रचार केला जात आहे. वृत्तपत्रांनीही या मोहिमेला ‘सक्ती’ असे न म्हणता हेल्मेटच्या आवश्यकतेबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.अपघाती मृत्यूमध्ये तरुणांचे प्रमाण अधिकपरिवहन आयुक्त शेखर चन्ने या वेळी म्हणाले, राज्यात ३ कोटी ४१ लाख इतके परवानाधारक वाहनचालक आहेत. राज्यात अपघातांचे प्रमाण ०.३६ टक्क्यांनी कमी झाले असले, तरी अपघाती मृत्यूचे प्रमाण मात्र ४ टक्क्यांनी वाढले आहे. पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकी यांच्या अपघातांचे प्रमाण हे ६६ टक्के इतके आहे. अपघाती मृत्यूमध्ये २५ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. राज्यात १ हजार ३२४ इतके ब्लॅक स्पॉट असून ते काढून टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.मुंबईत सीसीटीव्हीमुळे कारवाईत वाढमुंबई शहरात अतिवेग आणि बेदरकार वाहन चालविल्याप्रकरणी २०१७ मध्ये ४१ हजार कारवाया करण्यात आल्या होत्या. पण त्यानंतर शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे १ जानेवारी २०१८ पासून शहरात अशा ७ लाख ७० हजार लोकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी दिली.वाहतुकीचे नियम मोडणाºयांवर सध्या मुंबईत ई-चलानद्वारे कारवाई करण्यात येत असून लवकरच संपूर्ण राज्यात ही यंत्रणा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.च्रस्ते अपघातात अनेक जण मृत्यूमुखी पडत आहेत. जनजागृती करूनही अतिघाईत वेगावर नियंत्रण ठेवत नसल्यामुळेच अनेकांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.राज्यात २०१६ मध्ये १२ हजार ९३५, २०१७ मध्ये १२ हजार ५११ तर २०१८ मध्ये १३ हजार ५९ अपघाती मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात