दहावी, बारावी फेरपरीक्षेसाठी एका वर्गात १२ विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 02:24 AM2020-11-18T02:24:54+5:302020-11-18T02:25:02+5:30

विभागीय मंडळ : १० मिनिटांहून अधिक विलंब झाल्यास परीक्षा देता येणार नाही

12 students in a class for 10th, 12th re-examination | दहावी, बारावी फेरपरीक्षेसाठी एका वर्गात १२ विद्यार्थी

दहावी, बारावी फेरपरीक्षेसाठी एका वर्गात १२ विद्यार्थी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेसाठी एका वर्गात १२ विद्यार्थी बसवायचे आहेत, १३ वा विद्यार्थी हा दुसऱ्या वर्गात बसविण्याची व्यवस्था केंद्रप्रमुखांनी करावी, अशा सूचना विभागीय मंडळांनी फेरपरीक्षेच्या शाळांच्या केंद्रप्रमुखांना दिल्या.
मुंबई विभागीय मंडळाकडून फेरपरीक्षा पार पडणार आहेत. तेथील केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत अर्धा तास विद्यार्थी उशिरा पोहोचल्यास त्याला परीक्षा देण्याची परवानगी होती, मात्र या परीक्षेला केवळ १० मिनिटे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यालाच परीक्षा केंद्रात प्रवेश मिळू शकेल.
प्रत्येक विद्यार्थ्याने मास्क लावणे बंधनकारक असून सुरक्षितता व स्वच्छतेच्या इतर सुविधांसाठी केंद्रांना मंडळाकडून २००० रुपये अग्रीम रक्कम देण्यात येईल. केंद्रातील प्रवेश आणि बाहेर जाण्याचे नियोजन करताना विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर राखले जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फेरपरीक्षेच्या वेळी पोलीस बंदोबस्त नेहमीसारखाच कडक असणार असून केंद्रप्रमुखांनी उपस्थिती, गैरहजर, गैरप्रकार, संसर्गित विद्यार्थी रुग्ण या सर्वांची नोंद व माहिती ऑनलाइन करून ती लगेच मंडळांना कळवायची आहे.
रनर केंद्रावरच थांबणार
ल्ल दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची पेपरफुटी रोखण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कस्टोडियनकडून प्रत्येक शाळेत
प्रश्नपत्रिकांचे संच पोहोचवणारे रनर केवळ केंद्रांवरील बैठक व्यवस्था पाहणार आहेत.
ल्ल प्रश्नपत्रिका दिल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत संबंधित केंद्रातच ते थांबतील. यामुळे पेपरफुटीला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला.

साहित्य अपुरे पडण्याची भीती
मंडळाकडून फेरपरीक्षा केंद्रावर प्रत्येकी १०० ते ११० विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझरचे ५ लीटरचे कॅन, २ थर्मल गन, दोन हँड्स स्प्रे देण्यात येतील. फेरपरीक्षा १० दिवस असेल. त्यामुळे इतक्या दिवसांसाठी हे साहित्य पुरेसे होईल का, असा प्रश्न केंद्रप्रमुखांना पडला आहे.

Web Title: 12 students in a class for 10th, 12th re-examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा